चीनमध्ये आहे आशियातील सर्वात मोठा सैनिक बेस कॅम्प, इथे खोटं युद्ध करून तयार होतात सैनिक...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:16 PM2020-06-24T15:16:11+5:302020-06-24T15:52:20+5:30

चीन गेल्या 60 वर्षांपासून असं करत आहे. जेणेकरून युद्धावेळी आपल्या सैनिकांना मोठ्या प्रमाणा तैनात करता यावं. चला जाणून घेऊ चीनच्या ट्रेनिंग बेस कॅम्पमध्ये काम कसं चालतं.

चीनच्या सेनेबाबत म्हटलं जातं की, सैनिकांना इतकं कठोर प्रशिक्षण दिलं जातं की, ते दुसऱ्या कोणत्याही कितीही मजबूत सेनेचा सामना करू शकतात. चीन आपल्या सैनिकांना वर्षानुवर्षे चालत असलेल्या प्रशिक्षणात तयार करतं. असे सांगितले जाते की, संपूर्ण आशियात चीनमध्ये एक सर्वात मोठं प्रशिक्षण केंद्र आहे. हे मंगोलियाच्या आत तयार करण्यात आलंय.

आशियातील सर्वात मोठ्या सैनिक प्रशिक्षण कॅम्पला जुरिहे कम्बाइन्ड टॅक्टिक्स ट्रेनिंग बेस या नावाने ओळखले जाते. या बेस कॅम्पमध्ये चिनी सैनिक वेगवेगळ्या गटात विभागून युद्धाचा सराव करतात. इथे सैनिक युद्ध मैदानात लढत असल्यासारखेच लढतात. (Image Credit : DailyMail)

असे सांगितले जाते की, चीन गेल्या 60 वर्षांपासून असं करत आहे. जेणेकरून युद्धावेळी आपल्या सैनिकांना मोठ्या प्रमाणा तैनात करता यावं. चला जाणून घेऊ चीनच्या ट्रेनिंग बेस कॅम्पमध्ये काम कसं चालतं.

उत्तर चीनच्या सुदूर परिसरात तयार केलेला जरिहे कॅम्प पीपल्स लिबरेशन आर्मीचा सर्वात अॅडव्हांस ट्रेनिंग बेस आहे. हा कॅम्प चीनच्या इतर सैनिक कॅम्पपेक्षा वेगळा आहे. इथे सेना त्यांच्या सैनिकांना एका खास उद्देशासाठी म्हणजे युद्धासारख्या स्थितीशी निपटण्याचं ट्रेनिंग देते. (Image Credit : DailyMail)

चीनचा हा बेस जवळपास 1,066 वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. ही जागा इतकी मोठी आहे की, यात हॉंगकॉंग सामावू शकतो. इथे सैनिकांना घरासारखा फिल देण्यासाठी हॉस्पिटल, पार्क, थिएटर आणि दुकाने अशा सुविधा आहेत. इतकेच नाही तर इथे दुश्मन देशात असलेल्या इमारतींसारख्या दिसणाऱ्या इमारती सुद्धा आहेत. जेणेकरून लढाईसारखं वातावरण रहावं. (Image Credit : DailyMail)

या कॅम्पमध्ये केवळ मैदानासारखीच नाही तर डोंगर आणि वाळू असलेल्या परिसरातही लढाईचा अभ्यास केला जातो. यामागे चीनचा एकच उद्देश आहे की, त्यांचे सैनिक कोणत्याही स्थितीत लढण्यासाठी तयार व्हावे. (Image Credit : DailyMail)

चीनच्या सेनेकडून केल्या जात असलेल्या या खोट्या लढाईचे अनेक किस्से चीनच्या सेंट्रल टेलिव्हिजनवर येत राहतात. याच परिसरात एक असं भवन आहे जे ताइवान प्रेसिडेन्ट ऑफिससारखं दिसतं. चीनमधील काही लोकांचं मत आहे की, चीन अशाप्रकारे भवन तयार करून ताइवानला धमकी देत आहे.

चीनने त्यांच्या सेनेला मॉक लढाईसाठी दोन गटात विभागलं आहे. एक लाल तुकडी आणि दुसरी निळी तुकडी. पाश्चिमात्या देशांमध्ये मॉक लढाईसाठी दुश्मन सेनेला लाल रंग दिला जातो. पण चीन कम्युनिस्ट देश आहे. त्यामुळे चीनने दुश्मन टोळीसाठी निळा रंग आणि स्वत:साठी लाल रंग ठेवला आहे. (Image Credit : DailyMail)

चीनमध्ये या खोट्या युद्धाला स्ट्राइड म्हटलं जातं. या खोट्या लढाईची आणखी एक बाब म्हणजे या माध्यमातून चीन आपल्या दुश्मन देशांच्या सैन्य रणनीतिचं अभ्यास करतात. चीनच्या दुश्मन देशांच्या यादीत पाश्चिमात्य देशांसह भारताचाही समावेश आहे.

या खोट्या लढाईत चीनच्या सैनिकांकडे ती सगळे शस्त्रास्त्रे असतात जी युद्धात वापरली जातात. इतकेच नाही तर या खोट्या युद्धात चिनी सेनेकडून परमाणु अणि जैविक शस्त्रास्त्रांचा अभ्यासही केला जातो. पण याबाबत अधिकृत काहीही सांगितलं जात नाही. (Image Credit : DailyMail)

चीनच्या या ट्रेनिंग बेसची तुलना अमेरिकेतील फॉर्ट इरविनसोबत केली जाते. अमेरिकेने हा कॅम्प 1979 मध्ये कॅलिफोर्नियाच्या मरूस्थलमध्ये तयार केला होता. हा बेस कॅम्प 2,600 स्क्वेअर किलोमीटर परिसरात आहे. इथेही चीनप्रमाणे खोटं युद्ध लढलं जातं. (Image Credit : en.wikipedia.org)