ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी आढळून आला रहस्यमय जीव, बघून हैराण झाले वैज्ञानिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:24 PM2022-04-18T18:24:00+5:302022-04-18T18:37:17+5:30

Sea Dragon : समुद्री जीवांवर रिसर्च करणारे संशोधक दररोज दुर्मीळ जीवांचा शोध घेत असतात, जे बघून हैराण व्हायलं होतं. नुकताच समुद्र किनारी असाच अनोखा जीव आढळून आला.

समुद्रात हजारो चमत्कारिक आणि रहस्यमय असे जीव असतात. यातील फार मोजकेच आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या जीवांसोबतच समुद्रात खोलवर अनेक दुर्मीळ वनस्पती आणि वस्तूही असतात. समुद्रात होत असलेल्या हालचालींवर संशोधन सतत नजर ठेवून असतात.

समुद्री जीवांवर रिसर्च करणारे संशोधक दररोज दुर्मीळ जीवांचा शोध घेत असतात, जे बघून हैराण व्हायलं होतं. नुकताच समुद्र किनारी असाच अनोखा जीव आढळून आला. ज्याला बघून तुम्हीही थक्क व्हाल. (Image Credit : animals.net)

ऑस्ट्रेलियात रिकॉर्ड पावसानंतर समुद्र किनारी अनेक अजब जीव बघायला मिळत आहेत. न्यू साऊथ वेल्समध्ये समुद्री तटावर काही असे मासे दिसले ज्यांना बघून स्वत: संशोधकही हैराण झालेत. पावसानंतर समुद्र किनारी सीड्रॅगन क्रोनुल्ला, मालाबार आणि सेंट्रल कोस्टमध्ये ही जीव दिसून येत आहेत. जे जीव खोल समुद्रात राहतात.

टेक्नॉलॉजी यूनिव्हर्सिटी सिडनीमध्ये समुद्रावर अभ्सास करणारे डॉ. डेविड बूथ यांनी हे जीव आढळून आल्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, हे जीव हैराण करणाऱ्या वातावरणामुळे समुद्र किनारी आले असतील. (Image Credit : portlincolntimes.com.au)

त्यांनी पुढे सांगितलं की, हे मासे आढळून आल्याची कारणं प्रदूषण आणि उंच लाटा असू शकतात. सर्वात आश्चर्याची ही बाब आहे की, ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात नेहमीच हे जीव दिसतात आणि ते त्यांच्या घरातच राहतात.

समुद्र किनारी हे जीव दिसणं एक असामान्य घटना आहे. हे त्यांच्या आजूबाजूच्या केवळ ५० ते ५०० मीटर भागातच फिरतात. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर आढळून आलेल्या या जीवांना सीड्रॅगन म्हणून ओळखलं जातं. हे वेगवेगळ्या रंगांचे असतात आणि त्यांचा जांभळा-पिवळा रंग आकर्षक दिसतो

सीड्रॅगनची लांबी ४५ सेमी इतकी असते. हे खडकांखाली लपून राहतात. त्यांचा संबंध सीहॉर्स प्रजातीसोबत आहे. याआधी ब्रिटनमध्ये डायनासॉरचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगाडा मिळाला होता.

वैज्ञानिकांनी ऑस्ट्रेलियातील मिडलॅंड भागात १८ कोटी वर्ष जुना समुद्री ड्रॅगनचा सांगाडा शोधला होता. ब्रिटनच्या इतिहासात या शोधाला सर्वात महान जीवाश्म शोध म्हटलं गेलं होतं. याआधीही ऑस्ट्रेलियात अनेक हैराण करणारे जीव आढळून आलेत.