गौतम अदानींची एवढी संपत्ती बुडाली की...पाकिस्तानची गरीबी संपली असती, कर्जातूनही बाहेर पडला असता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 04:58 PM2023-02-20T16:58:49+5:302023-02-20T17:15:51+5:30

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तेल, पीठ, डाळी तसेच इंधन या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत.

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तेल, पीठ, डाळी तसेच इंधन या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. एका अहवालानुसार, पाकिस्तानवर सध्या देशाच्या जीडीपीच्या ७० टक्के कर्ज आहे.

तर दुसरीकडे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने केले आहेत. यामुळे अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली.

हिंडनबर्गच्या आरोपामुळे अदानी समुहाचा मोठा तोटा झाला. आपल्या शेजारचा देश पाकिस्तान आर्थिक अडचमीत सापडला आहे. आता आयएमएफनेही पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला आहे.

पाकिस्तानचे विदेशी कर्ज 121.75 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे. हे कर्ज कसे फेडायचे हा आता पाकिस्तानसमोर प्रश्न आहे. दुसरीकडे तेवढी संपत्ती भारतातील एक उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती ३० दिवसांत बुडाली आहे. खरं तर, हिंडनबर्ग अहवाल आल्यापासून, अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे १२३ डॉलर अब्जांनी घसरले आहेत.

पाकिस्तानमध्ये पीठ, डाळी, तांदूळ, दूध, दही या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. एका अहवालानुसार, पाकिस्तानवर सध्या देशाच्या जीडीपीच्या ७० टक्के कर्ज आहे.

जर आपण सरकारी आकडेवारीबद्दल बोललो तर पाकिस्तानवर सरकारी कर्ज आणि इतर दायित्वे सुमारे ४०० लाख कोटी पाकिस्तानी रुपये आहेत. फक्त सरकारी क्षेत्रातील कर्जांबद्दल बोलायचे तर हा आकडा २.३ लाख कोटी रुपये थकीत आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार २४ जानेवारीपासून अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली आहे. २४ जानेवारीपासून अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप १३२ डॉलर अब्जांनी घसरले आहे. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते 127 डॉलर अब्ज होती, ती आता 47 डॉलर अब्जवर आली आहे. म्हणजेच ३० दिवसांत अदानी यांवी जेवढे गमावले, तेवढे पाकिस्तानचे कर्ज फेडता आले असते.