राहण्यासाठी सर्वोत्तम आहेत 'ही' 5 शहरे, जाणून घ्या संपूर्ण यादी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:35 PM2023-06-26T16:35:49+5:302023-06-26T17:10:25+5:30

या शहरांमधील वैद्यकीय सुविधा, शिक्षण, संस्कृती, मनोरंजन, पायाभूत सुविधा आदींच्या आधारे यादी तयार केली आहे.

ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स (GLI) जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोणते शहर राहण्यास योग्य आहे किंवा नाही, यासंदर्भात जगातील शहरांची एक यादी तयार केली आहे.

या शहरांमधील वैद्यकीय सुविधा, शिक्षण, संस्कृती, मनोरंजन, पायाभूत सुविधा आदींच्या आधारे यादी तयार केली आहे. या वर्षी जागतिक सरासरी स्कोअर गेल्या 15 वर्षांतील सर्वात अधिक आहे. टॉप पाच शहरांच्या यादीत प्रामुख्याने युरोप आणि ऑस्ट्रेलियातील शहरांचा समावेश आहे.

ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स (GLI) मध्ये ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना प्रथम क्रमांकावर आहे. सलग दुसऱ्यांदा हे जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनले आहे. शहराचा GLI स्कोअर 98.4 गुण आहे.

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात राहण्यायोग्य शहर आहे. या शहराचा GLI स्कोअर 98 गुण आहे. प्रत्येक शहराला GLI वैद्यकीय सुविधा, शिक्षण, संस्कृती, मनोरंजन, पायाभूत सुविधा इत्यादींच्या आधारे 100 पैकी गुण देण्यात आले आहेत.

या यादीत ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा GLI स्कोअर 97.7 आहे. कोविड-19 नंतर येथील वैद्यकीय सुविधांमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे.

याचबरोबर, या यादीत ऑस्ट्रेलियाचे सिडनी शहर चौथ्या क्रमांकावर आहे. सिडनीचा GLI स्कोअर 97.4 आहे. आरोग्य सुविधा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या जोरावर त्यांना हे गुण मिळाले.

कॅनडाचे वॅक्युव्हर हे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. या शहराचा GLI स्कोअर 97.3 आहे. विविधतेनुसार, हे कॅनडाचे मुख्य शहर आहे.