Husband-wife Fight: पती-पत्नीचे भांडण बाल्कनीपर्यंत गेले, मग जे झाले ते पाहून पोलिसही हैरान झाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:02 PM2021-05-30T19:02:01+5:302021-05-30T19:07:42+5:30

Husband-wife Fight: पती पत्नीमध्ये भांडणे होत राहतात. पण रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये जे झाले ते सर्वांनाच हैरान करणारे आहे.

पती पत्नीमध्ये भांडणे होत राहतात. पण रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये जे झाले ते सर्वांनाच हैरान करणारे आहे. Mirror Online नुसार येथे एक इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पती पत्नीमध्ये भांडण एवढे मोठे झाले की दोघांचाही जीव धोक्यात आला.

सेंट पीटर्सबर्गमध्ये एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ओल्गा वोल्कोवा आणि त्यांची पत्नी येवगेनी कार्लगिन यांच्यात काही गोष्टींवरून भांडण झाले होते. हे भांडण एवढे वाढले की, त्यांच्यात हाणामारी सुरु झाली. दोघेही झटापट करत फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये आले.

बाल्कनीमध्ये आल्यावरही त्यांना परिस्थितीचे भान राहिले नाही, दोघांचाही तोल रेलिंगवर होता. शेवटी ते रेलिंग तुटले.

रेलिंग तुटल्याने ते 25 फूट खाली जमिनीवर कोसळले. त्यांना पाहून लोकांची गर्दी जमा झाली. त्यांनी फोन करून अँम्बुलन्स बोलावली.

पती पत्नी हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रेलिंग एवढ्या सहज तुटले की याचा अंदाजही करता येणार नाही. पती-पत्नीमध्ये भांडण जोरजोरात सुरु होते. मारामारीही सुरु होती, याचवेळी हा अपघात झाला.

घटनेचा पुरा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे, जो आता व्हायरल होत आहे. घटनेनंतर पोलीस अधिकारीदेखील तिथे पोहोचले. रेलिंग तुटले कसे याचा ते आता तपास करत आहेत.

प्रत्यक्षदर्शी डेनिसने सांगितले की, मी माझ्या सहकाऱ्यांसोबत तेथून जात होतो. तेव्हा रस्त्याच्या व्हिडीओ बनवत होतो. याचवेळी माझे लक्ष बाल्कनीमध्ये भांडत असलेल्या पती-पत्नीकडे गेले आणि या घटनेचा व्हिडीओ आपोआपच शूट झाला.

जेव्हा ते पडले तेव्हा त्यांना गंभीर दुखापत झाली. तेथील वातावरण अफरातफरीचे झाले होते. गाडीचा सायरन अचानक वाजू लागल्याने लोकांनीही तिकडे धाव घेतली.

या दोघांचे नशीब म्हणजे, तिथे एक डॉक्टर हजर होता. त्याने लगेचच त्यांची तपासणी केली. ते बचावले असल्याचे सांगितले.

त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणार असल्याचे तो म्हणाला. यानंतर अॅम्बुलन्स ला फोन करून बोलविण्यात आले.