CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; पाचवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 01:36 PM2021-11-11T13:36:30+5:302021-11-11T13:48:54+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जग कोरोनाचा महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 252,198,076 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 5,089,480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनावर मात केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. जगभरात उपचारानंतर 228,257,224 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोनाच्या पाचव्या लाट आली असून गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिवियर वेरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेला सुरुवात झाली आहे. आपल्या शेजारी देशांमध्ये ही लाट आली आहे. त्यांचा डेटा पाहिला असता आधीपेक्षा यावेळी भयंकर स्थिती निर्माण होऊ शकते.

आधीच्या लाटेच्या तुलनेत ही लाट अधिक खतरनाक आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचं अत्यंत काटेकोरपणे पालन करा असं आवाहन ओलिवियर वेरन यांनी केलं आहे. जास्तीत जास्त लसीकरण आणि स्वच्छतेने आपण धोका कमी करू शकतो, त्याला हरवू शकतो असं देखील म्हटलं आहे.

फ्रान्समध्ये आतापर्यंत 73.46 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 1.19 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सातत्याने मोठी वाढ होत आहे. फेब्रुवारीत कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटाला हलक्यात घेणं आता जीवघेणं ठरू शकतं. तब्बल 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका निर्माण झाला असून WHO ने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. लसीकरणानंतरही युरोप कोरोना महामारीचं केंद्र झालं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काही देशांनी टेन्शन वाढवलं आहे. 53 देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या आणखी एका लाटेचा धोका आहे किंवा यातील बरेच देश आधीच महामारीच्या नवीन लाटेचा सामना करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हॅन्स क्लुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या ही पुन्हा विक्रमी पातळीवर वाढू लागली आहे. या भागात कोरोना प्रसाराचा वेग ही बाब गंभीर चिंतेचा विषय आहे.

जर हे असंच सुरू राहीलं तर फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो असं देखील म्हटलं आहे. जगभरात लसीकरण वेगाने सुरू असताना देखील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही भागात लसीकरणाचा कमी दर, हा सांगून जातो की कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ का होत आहे. डॉ क्लुज यांनी गेल्या एका आठवड्यात 53 देशांमध्ये कोविडमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याचं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसचं नवनवीन रुप समोर येत असल्याने धोका आणखी वाढला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिकोचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू याच देशांमध्ये झाले आहेत.