Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:18 PM2021-08-17T14:18:02+5:302021-08-17T14:29:18+5:30

Afghan provinence Panjshir unbeaten from 4 decades: अफगानिस्तान अजून हरलेला नाहीय. एका प्रांताने तालिबानच्या नाकीनऊ आणले असून चहुबाजुंनी वेढलेला असूनही तेथील लढवय्ये निकराची झुंज देत आहेत. हा प्रांत ना तालिबानला जिंकता आलेला ना रशियाला. तेव्हाही निकराने लढला होता.

अफगानिस्तान (Afghanistan) वर 20 वर्षांनी पुन्हा तालिबानी (Taliban) राजवट येणार आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडलेला आहे, यामुळे राजधानी काबुलमध्ये सगळीकडे तालिबानी दहशतवादी दिसत आहेत. काबुल पडले तरी अफगानिस्तान अजून हिंमत हारलेला नाहीय. (anti-Taliban front forming in Afghanistan's Panjshir? Ex top spy Saleh, son of 'Lion of Panjshir' meet at citadel)

अफगानिस्तान अजून हरलेला नाहीय. एका प्रांताने तालिबानच्या नाकीनऊ आणले असून चहुबाजुंनी वेढलेला असूनही तेथील लढवय्ये निकराची झुंज देत आहेत.

तालिबान अफगानिस्तानात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असताना एक प्रांत अद्याप त्यांच्या ताब्यात आलेला नाही. य़ा प्रांताचे नाव आहे पंजशीर.

अफगानिस्तानच्या 34 प्रांतापैकी एक असलेल्या या पंजशीर (Panjshir) प्रांतात घमासान युद्ध सुरु आहे. हा भाग देशाच्या उत्तर पूर्वेकडील भागात येतो. हा असा एकमेव प्रांत होका जो तालिबानच्या ताब्यात आला ना सोव्हिएत रशियाच्या ताब्यात गेला होता.

जर पंजशीरने तालिबानसमोर सरेंडर केले तर ही एक मोठा खळबळजनक घटना असेल. कारण तालिबान आणि आल कायदाने मिळून 9/11 च्या हल्ल्याच्या दोन दिवस आधीच अहमद मसूद यांचे वडील अहमद शाह मसूद (Ahmad Shah Massoud) यांची हत्या केली होती.

अफगानिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करजई (Hamid Karzai) यांनी अहमद शाह मसूद यांना राष्ट्राचे नायक असा खिताब दिला होता. त्यांना पंजशीरचा वाघही म्हटले जात होते. मसूद आणि त्यांच्य़ा साथीदारांनीच मिळून तालिबान राज संपविण्यात मोठी भूमिका निभावली होती.

अहमद शाह मसूद यांनी सोव्हिएत रशियाला देखील पंजशीरची एक इंचही जागा घेऊ दिली नव्हती. त्यानंतर आलेल्या तालिबानलाही हा प्रांत कब्ज्यात घेता आला नव्हता.

त्यांचा मुलगा पंजशीरचा नेता अहमद मसूद (Ahmad Massoud) तालिबानला शरण जाण्यास नकार दिला आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यात ते तालिबानशी बोलण्यासाठई तयार असल्याचे म्हणत आहेत. मात्र, सोशल मिडीयावर दावे करण्यात येत आहेत की पंजशीरने सरेंडर केले आहे. याबाबत पंजशीरच्या नेत्यांकडून अद्याप दुजोरा आलेला नाही.

अहमद मसूद यांच्यासोबत अफगानिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या बैठकीचे फोटो देखील समोर आले आहेत. काबुलवर तालिबानने कब्जा केल्यावर सालेह अखेरचे पंजशीरमध्येच दिसले होते.

अमरुल्लाह सालेह अहमद मसूद सोबत मिळून तालिबानशी लढण्याची रणनीति बनवत आहेत, असे सांगितले जात आहे.

अहमद मसूद हा 2016 पर्यंत लंडमध्ये शिकत होता. अफगानिस्तानात परत येत त्याने 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तो 32 वर्षांचा आहे.