Potato Side Effects : तुम्हाला बटाटे खूप आवडतात? तुम्ही बटाटे खूप खाता? मग जाणून घ्या याचे 5 मोठे Side Effects

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:36 AM2022-05-05T07:36:50+5:302022-05-05T07:47:49+5:30

बटाटा हा भाज्यांचा राजा मानला जातो, पण बटाटे अधिक खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

बटाटा हा भाज्यांचा राजा मानला जातो, पण बटाटे अधिक खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही देखील चवीच्या नादात अधिक प्रमाणावर बटाटे खात असाल, तर आताच सावध व्हा. कारण यामुळे वजन वाढू शकते आणि मधुमेहही होऊ शकतो.

अधिक बटाटे खाल्ल्याने होऊ शकते अॅलर्जी - जर तुम्हीही अधिक प्रमाणावर बटाटे खात असाल तर काळजी घ्यायला हवी. कारण यामुळे तुम्हाला अॅलर्जीही होऊ शकते.

बटाट्यामध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट सांधेदुखीचा त्रास वाढवण्याचे काम करू शकते. यामुळे सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी अधिक प्रमाणावर बटाटे खावू नये.

मधुमेह असलेल्या रुग्णांनीही अधिक प्रमाणावर बटाटे खाणे टाळावे. यामुळे समस्या आणखी वाढू शकते. म्हणजेच ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण बटाट्यापासून दूरच राहिलेले बरे.

बटाटे अधिक खाल्ल्याने ब्लड प्रेशरचा त्रासही होऊ शकतो - एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल; ती म्हणजे, अधिक प्रमाणात बटाटे खाल्ल्यानेही रक्तदाब वाढू शकतो. म्हणजेच ब्लड प्रेशरचा (बीपी) त्रास असलेल्या रुग्णांनी अधिक प्रमाणावर बटाटे खाणे टाळावे.

वजन वाढण्याचा धोका - बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. यामुळे कॅलरीज अधिक प्रमाणावर वाढू शकतात. परिणामी, अधिक प्रमाणावर बटाटे खाणे, हे लठ्ठपणाचे कारणही ठरू शकते.