पंजाब 'किंग्स'! ट्वेंटी-२० क्रिकेटमधील मोडला दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्येही भीमपराक्रम

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ स्पर्धा ही फलंदाजांनी गाजवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 11:18 PM2024-04-26T23:18:23+5:302024-04-26T23:19:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : PUNJAB KINGS CHASED DOWN HISTORIC 262 IN JUST 18.4 OVERS, break South Africa world record | पंजाब 'किंग्स'! ट्वेंटी-२० क्रिकेटमधील मोडला दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्येही भीमपराक्रम

पंजाब 'किंग्स'! ट्वेंटी-२० क्रिकेटमधील मोडला दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्येही भीमपराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ स्पर्धा ही फलंदाजांनी गाजवली आहे. यंदाच्या पर्वात सर्वाधिक ४ वेळा संघांनी २५०+ धावा चोपल्या. कोलकाताच्या ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सने २६१ धावा उभ्या केल्यानंतर पंजाब किंग्सला हा भार सोसणार नाही असेच वाटलेले. पण, दोन सामने बाकावर बसवल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow) वादळी शतक झळकावून KKR चे धाबे दणाणून सोडले. 

जॉनी जॉनी... १६ चेंडूंत ८० धावा! बेअरस्टोचे ईडन गार्डवर वादळी शतक; अश्विनची “Save the bowlers” पोस्ट

PBKS ला प्रभसिमरन सिंग व जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ९३ धावा उभ्या केल्या.  प्रभसिमरनने २० चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावांवर दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. रायली रूसो  ( २६) याच्यासोबत बेअरस्टोने PBKS ला १० षटकांत १ बाद १३२ धावांपर्यंत पोहोचवले. २०१४ मध्ये त्यांनी SRH विरुद्ध पहिल्या १० षटकांत ३ बाद १३१ धावा केल्या होत्या आणि आज तो विक्रम मोडला. बेअरस्टो आणि रूसो यांनी ३९ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली.  PBKS ने १५ षटकांत २ बाद २०१ धावा उभ्या केल्या आणि शेवटच्या ३० चेंडूंत ६१ धावा त्यांना करायच्या होत्या. नरीनने त्याच्या ४ षटकांत फक्त २४ धावा देत १ विकेट घेतली.  



बेअरस्टोने ४५ चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले आणि त्यात ८ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. शशांक सिंगनेही फॉर्म कायम राखताना बेअरस्टोसह २७ चेंडूंत पन्नास धावा पूर्ण केल्या आणि आता पंजाबला १८ चेंडूंत ३४ धावा हव्या होत्या. पंजाब किंग्सने आयपीएल इतिहासात एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक २० षटकारांचा विक्रमही मोडला. शशांकने दोन खणखणीत षटकार खेचून २३ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हर्षित राणाने टाकलेल्या १८व्या षटकात शशांकने २५ धावा चोपल्या. जॉनी ४८ चेंडूंत ८ चौकार व ९ षटकारांसह १०८ धावांवर नाबाद राहिला. शशांकने २८ चेंडूंत २ चौकार व ८ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला. पंजाबने १८.४ षटकांत २ बाद २६२ धावा करून विजय मिळवला. 
 
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध २५९ धावांचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला होता. आयपीएलमध्ये २२४ या सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग राहिला आहे. 

तत्पूर्वी, ईडन गार्डनवर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली. KKR ने ६ बाद २६१ धावांचा डोंगर उभा केला. सुनील नरीनने ३२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७१ धावा चोपल्या, तर फिल सॉल्टने ३७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावा केल्या. या दोघांनी ईडन गार्डनवर आयपीएल इतिहासात सर्वाधिक १३८ धावांच्या भागीदारीचा विक्रम नावावर केला. आंद्रे रसेल ( २४), श्रेयस अय्यर ( २८) व वेंकटेश अय्यर ( ३९*) यांनीही चांगले फटके खेचून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
 

Web Title: IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : PUNJAB KINGS CHASED DOWN HISTORIC 262 IN JUST 18.4 OVERS, break South Africa world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.