शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:54 IST

1 / 6
आंबवलेले अन्नपदार्थ म्हणजे दही, ताक, इडली, डोसा, ढोकळा, कांजी आणि लोणची ही घरोघरी तयार केली जाणारी.
2 / 6
आंबवणे ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया असून यात अन्नातील किंवा वातावरणातून आलेले उपयुक्त सूक्ष्मजंतू अन्नातील साखर व कर्बोदकांचे रूपांतर लॅक्टिक आम्ल, अल्कोहोल, कार्बन डायऑक्साइड आणि इतर उपयुक्त घटकांमध्ये करतात.
3 / 6
प्रामुख्याने वेगवेगळे लॅक्टिक आम्ल जीवाणू (लॅक्टोबॅसिलस, लॅक्टोकॉकस, ल्यूकोनोस्टोक इ.) आणि काही वेळा यीस्ट (सॅकॅरोमायसेस) चा यामध्ये सहभाग असतो. हे सूक्ष्मजंतू अन्नातील प्रथिनांचे अमिनो आम्लात, तर कर्बोदकांचे रूपांतर साध्या साखरेत करतात. यामुळे अन्न पचायला हलके होते.
4 / 6
अन्नपदार्थात क्वचित आढळणारी ब-जीवनसत्वे, फोलेट आणि जीवनसत्त्व के काही लॅक्टिक आम्ल जीवाणू तयार करतात. किण्वित पदार्थातील प्रोबायोटिक सूक्ष्मजंतू आतड्यांमध्ये बसून अपायकारक जंतूंशी स्पर्धा करतात तसेच आतड्याच्या पेशी मजबूत करत प्रतिकारशक्ती वाढवणारे द्रव्ये तयार करतात.
5 / 6
यामुळे पचन तर सुधारतेच, याशिवाय बद्धकोष्ठता, जुलाब, गॅस यांसारख्या तक्रारी कमी होतात. किण्वित पदार्थ आतड्यांतील उपयुक्त सूक्ष्मजंतूंचे संतुलन राखतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मधुमेह, लठ्ठपणा, अॅलर्जी, तसेच दाहजन्य आजारांचा धोका कमी होतो.
6 / 6
किण्वनामुळे अन्नाची चव, वास आणि दर्जा सुधारतो. इडली-डोशाचे पीठ फुलण्यामागे किण्वनादरम्यान कार्बन डायऑक्साइड तयार करणारे जीवाणू आणि यीस्ट कारणीभूत असतात. दुधापासून दही तयार होताना लॅक्टिक आम्लामुळे दुधातील केसिन प्रथिने एकवटतात. त्यामुळे दही घट्ट होते. इडली, डोसा मऊ स्पंजसारखे होतात.
टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नLifestyleलाइफस्टाइल