अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डनं डिलिवरीनंतर 11 दिवसांतच असं कमी केलं वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 12:59 PM2019-09-09T12:59:38+5:302019-09-09T13:05:05+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आपल्या प्रेग्नंसीमुळे बरीच चर्चेत होती. सध्या ती आपलं मदरहुड एन्जाय करताना दिसत आहे. तिने जुलैमध्ये एका मुलाला जन्म दिला होता. अर्जुन आणि गॅब्रिएला प्रेग्नंसी दरम्यानही सोशल मीजडियावर अॅक्टिव्ह होते. एवढच नाहीतर गरोदरपणानंतरही ते दोघेही डेट एन्जॉय करताना दिसले. पण या सर्व गोष्टींमध्ये एका गोष्टीकडे प्रत्येकाचंच लक्षं गेले ते म्हणजे, प्रेग्नंसीनंतर काही दिवसांतच गॅब्रिएलाने बेबी फॅट कमी केलं आणि आपल्या जुन्या फिगरमध्ये पुन्हा दिसून आली.

बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच जेव्हा ती अर्जुनसोबत डिनरसाठी जाताना दिसली त्यावेळी तिचं पोट एकदम फ्लॅट दिसून आलं. अनेक लोक तिला प्रश्न विचारत होते की, तिने नक्की प्रेग्नंसी वेट कमी कसं केलं? अखेर गॅब्रिएलाने आपलं बेबी फॅट कमी करण्याचं सीक्रेट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमार्फत सर्वांसोबत शेअर केलं.

गॅब्रिएला ने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटोज पोस्ट केले ज्यांपैकी एका फोटोमध्ये ती बेबी बंपसोबत दिसून आली तर दुसऱ्या फोटोमध्ये ती 11 दिवसांनंतरच फॅट टमीमध्ये दिसून आली.

आपल्या या फोटोंमार्फत तिने सांगितलं की, तिचं प्रेग्नंसीमध्ये जवळपास 21 किलो वजन वाढलं होतं. परंतु, तिला त्याबाबत काहीच वाटलं नाही. तिच्यासाठी महत्त्वाचं तिच्या बाळाचं आरोग्य होतं. बाळाचा जन्म हेल्दी झाला.

गॅब्रिएला ने सांगितलं की, गरोदरपणा दरम्यान तिने वर्कआउटकडे अजिबात दुर्लक्षं केलं नाही. आधीप्रमाणे ती हेव्ही वर्कआउट करू शकत नव्हती. परंतु, तिने आठवड्यातून पाच दिवस जिममध्ये जाणं सुरू ठेवलं. तिने इतर महिलांनाही प्रेग्नंसीमध्ये वर्कआउट करणं न थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

गॅब्रिएला ने सांगितलं की, मला जेव्हा आराम करावसं वाटत होतं, त्यावेळी मी आराम करायचे.

गॅब्रिएला ने सांगितले की, प्रेग्नंसीमध्ये तिला जे खावसं वाटत होतं ते मी खायचे. फक्त जेवढी भूक असायची तेवढचं मी खायचे.

फक्त 11 दिवसांतच प्रेग्नंसी वेट आणि फॅट लूज करण्याबाबत गॅब्रिएला ने सांगितले की, तिने प्रीनेटल योगा केला. ज्यामुळे तिला पेलविक फ्लोरला स्ट्रॉन्ग करण्यासाठी मदत मिळाली.

सर्वात शेवटी गॅब्रिएलाने ही गोष्टही सर्वांना आवर्जुन सांगितली की, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. काही जणांना वजन कमी करण्यासाठी फार वेळ लागतो तर काहींच वजन लगेच कमी होतं. पण हिम्मत ठेवून स्वतःचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा.

टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही दावा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.