शंखनादामुळे सौंदर्य खुलवण्यासहीत आजारही होतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 06:06 PM2019-02-01T18:06:02+5:302019-02-01T18:13:31+5:30

आरोग्यासहीत सौंदर्य खुलवण्यास उपयोगी असे कित्येक मिनरल्स शंखामध्ये उपलब्ध आहेत. रोज शंखनाद केल्यास आणि शंखामध्ये ठेवलेले पाणी प्यायल्यास तुमच्या आरोग्यासंबंधीच्या कित्येक समस्या दूर होण्यास मदत होते. शंखनादामुळे चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. सोबतच फुफ्फुसांचेही आरोग्य सुधारते.

शंखनाद केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. शंखनादामुळे चेहऱ्यावरील स्नायू ताणले जातात, चेहऱ्याचा योग्यरित्या व्यायाम होतो.

मुरुमं, चेहऱ्यावरील काळे डाग यांसारख्या समस्या शंखनाद आणि शंखामध्ये ठेवण्यात आलेल्या पाणी प्यायल्यास दूर होतात. रात्रभर शंखामध्ये पाणी भरुन ठेवावे आणि त्यातील पाण्याने सकाळी हलक्या हातानं मसाज करावा आणि त्या पाण्याचे सेवनही करावे.

अ‍ॅलर्जी, लाल पुरळ अथवा पांढरे डाग यांसारख्या त्वचेच्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास शंखातील पाण्यानं चेहऱ्याचा मसाज करावा.

नियमित शंखनाद केल्यास तुमचा ताणतणाव दूर होईल. कारण शंखनादामुळे तुमच्या मेंदूच्या भागाचे रक्तभिसरण योग्यरितीनं होते आणि स्ट्रेस लेव्हल नियंत्रणात येते. याशिवाय, दिवसभर तुमचे डोके शांतही राहते.

शंखनादामुळे रेक्टल स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात, यामुळे शरीराच्या आतील अवयवांचा व्यायाम होतो. यामुळे गॅस आणि पोटाच्या आजारांतून सुटका होते.

शंखामध्ये कॅल्शिअम, गंधक आणि फॉस्फरससारखे गुण आहेत. शंखामध्ये ठेवलेल्या पाण्याचे सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. याशिवाय, नियमित शंखातून पाणी प्यायल्यास हाडेदेखील मजबूत होतात.

शंखनादामुळे फुफ्फुसांचा चांगला व्यायाम होतो, यामुळे तुमचे आयुष्य निरोगी राहण्यास मदत होते. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी शंखनाद करावा. श्वसनाच्या समस्यास कमी होण्यास मदत होईल.