कापडी मास्क नेमका किती काळ वापरू शकतो? एकदा ही माहिती नक्की वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:46 AM2021-09-14T10:46:41+5:302021-09-14T10:55:34+5:30

कोरोनानं जगाला वेटोळे घालण्यास सुरुवात केल्यानंतर मास्क लावण्याचे प्रमाण वाढू लागले. कोरोनाचा कहर जसजसा वाढू लागला तसतसे मास्कचे अनेक प्रकार बाजारात येऊ लागले. कापडी मास्कही त्यात होते. मात्र, त्यावर टीका होऊ लागली. कापडी मास्क नेमका किती काळ वापरण्यास योग्य असतो? जाणून घेऊयात...

कापडी मास्कवर सुरुवातीच्या काळात खूप टीका झाली. पण असे असले तरी हे कापडी मास्कही कोरोनाचा संसर्ग रोखण्यास सक्षम असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

कोलोरॅडो विद्यापीठाच्या चमूने कोणता मास्क सर्वाधिक सुरक्षित ठरतो, याचेही संशोधन केले. कापडी मास्कमुळे २३ टक्के हवा फिल्टर होऊन शरीरात जाऊ शकते. या दराने कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो, असेही यावेळी निदर्शनास आले.

सर्जिकल मास्कमुळे कोरोना विषाणूपासून बचाव होण्याचे प्रमाण ४२ ते ८८ टक्के एवढे आहे.

एन-९५ मास्क सर्वात सुरक्षित असून कोरोना विषाणूपासून ९५ ते ९९ टक्के बचाव करतात.

कापडी मास्क लावणे अगदीच वाईट दिसत असले तरी ते धुवून स्वच्छ करुन वापरता येणे शक्य असते.

कापडी मास्क धुवून स्वच्छ केले तरी कोरोना विषाणूला शरीरात शिरण्यापासून रोखण्याची त्यांची क्षमता कमी होत नाही.

त्यामुळे हे मास्क पुन्हा वापरण्यायोग्य असून ते फेकू नका, असे संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोलोरॅडो विद्यापीठाने केलेले हे संशोधन एअरोसोल अँड एअर क्वालिटी रिसर्च या मासिकात प्रकाशित झाले आहे.