Coronavirus : WHO कडून कोरोनाबाबत इशारा, म्हणाली - जग आता नव्या आणि अधिक घातक फेजमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:52 AM2020-06-20T10:52:01+5:302020-06-20T11:11:49+5:30

WHO कडून सांगण्यात आले की, लॉकडाऊन उघडल्यानंतर अचानक मोठ्या संख्येने नवीन केसेस समोर येत असतील तर आश्चर्य वाटू नये.

कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात अजूनही थांबत नाहीय. अशात दररोज कधी सुखद तर दुखद माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनकडून देण्यात येते.

आता कोरोना व्हायरसबाबत WHO ने इशारा दिला आहे. WHO नुसार जग आता एका नव्या आणि अधिक घातक फेजमध्ये पोहोचली आहे.

WHO कडून सांगण्यात आले आहे की, वेगवेगळ्या देशांमध्ये महामारीचा वेगवेगळा फेज आहे. पण वैश्विक स्तरावर व्हायरस पसरण्याचा स्पीड वाढत आहे.

शुक्रवारी WHO चे डायरेक्टर जनरल टेड्रोस एनहॅनम घेब्रियेसुस म्हणाले की, व्हायरस अजूनही वेगाने पसरत आहे आणि अजूनही हा व्हायरस जीवघेणा आहे. जास्तीत जास्त लोक अजूनही संवेदनशील आहेत.

आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी अनेक देशांवर दबाव वाढत आहे. WHO ने इशारा दिला आहे की, वेगवेगळ्या देशांतील सरकारांनी अचानक मोठ्या संख्येने केसेस समोर येण्यासाठी तयार रहावं. (Image Credit : indiatvnews.com)

WHO कडून सांगण्यात आले की, लॉकडाऊन उघडल्यानंतर अचानक मोठ्या संख्येने नवीन केसेस समोर येत असतील तर आश्चर्य वाटू नये.

तसेच मध्य पूर्व आणि दक्षिण आशियात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. (Image Credit : eurasianet.org)

WHO च्या प्रमुखांनी सांगितले की, लोकांनी निश्चितपणे पूर्ण काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं. तसेच मास्क घालावा आणि सतत हातही धुवावे.