रोज आंघोळ करण्याची नाही गरज, तज्ज्ञांनुसार केवळ हे तीन अवयव स्वच्छ करूनही दूर राहतील आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:21 PM2022-07-26T12:21:13+5:302022-07-26T12:36:28+5:30

Health Tips : विज्ञान असं सांगतं की, तुम्हाला रोज आंघोळ करण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही रोज शरीरातील केवळ तीन अवयवांची स्वच्छता करा.

हे तर सर्वांनाच माहीत आहे की, सकाळी उठून आंघोळ केली तर दिवस चांगला जातो आणि फ्रेशही वाटतं. काही लोक तर रात्री झोपण्यापूर्वीही आंघोळ करतात. आंघोळ केल्याने शरीराची स्वच्छता होते आणि अनेक आजार शरीरापासून दूर राहतात. पण आंघोळीबाबतच्या या समजेबाबत विज्ञान समहत नाही.

विज्ञान असं सांगतं की, तुम्हाला रोज आंघोळ करण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही रोज शरीरातील केवळ तीन अवयवांची स्वच्छता करा. चला जाणून घेऊ निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी तुम्ही किती वेळा आंघोळ करावी आणि रोज कोणत्या तीन अवयवांची स्वच्छता करावी.

एका रिपोर्टनुसार, पुन्हा पुन्हा आंघोळ करण्याचे त्वचेला फायदे होण्याऐवजी नुकसान जास्त होतात. उदाहरणार्थ याने तुमची त्वचा सुष्क होते, खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही केमिकल पदार्थांचा किंवा साबणाचा वापर करता. त्यासोबतच याने बॉडी ऑइल, लिपिड आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. जे तुमच्या त्वचेला सूजेपासून वाचवतात आणि एक ओलावा कायम ठेवतात.

कितीवेळा आंघोळ करावी? - एका रिपोर्टमध्ये प्रसिद्ध डॉक्टर क्रिस यांनी सांगितलं की, रोज आंघोळ करणं तुमच्यासाठी नुकसानकारक आहे. कारण याने त्वचेवरील फायदेशीर फायदेशीर बॅक्टेरिया निघून जातात. त्यासोबतच रोज आंघोळ केल्याने त्वचेसोबत केसांचंही नुकसान होतं. डॉक्टर सांगतात की, जास्त शॅम्पूचा वापर केल्यान केस रखरखीत होतात आणि त्यांचा रंगही हलका होतो. त्यामुळे अनेक त्वचा तज्ज्ञ आठवड्यातून दोन किंवा तीन वेळ आंघोळ करण्याचा सल्ला देतात. याशिवाय प्रत्येक दुसऱ्या दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त वेळाने शॅम्पू करणं योग्य राहील.

अंडरआर्म्स स्वच्छ करा - आपलं शरीर डोक्यापासून पायापर्यंत साबणाच्या पाण्याने धुतल्याने त्वचेसंबंधी समस्या होतात. तेच अंडरआर्म्स भागाची स्वच्छता करणं गरजेचं आहे. डॉक्टर सॅंडी स्कोट्निकी म्हणाले की, बगलेसोबतच तीन अवयवांची स्वच्छता करणं गरजेचं आहे. जेणेकरून एक्जिमासारख्या समस्येपासून वाचता येईल.

कंबरेची स्वच्छता गरजेची - मीठ आणि क्लोरीन, फ्लोराइड आणि कीटकनाशकांसारखे रसायनयुक्त पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचं नुकसान होतं. म्हणून अंडरआर्म्ससोबतच कंबरेच्या भागाची स्वच्छता गरजेची आहे. बगलेसोबतच कंबरेखालच्या भागात केस आणि फंगस वाढण्याचा धोका असतो. संक्रमणापासून वाचण्यासाठी तुम्हाला या भागाची स्वच्छता करणं गरजेचं आहे.

पायांची स्वच्छताही गरजेची- रोज आंघोळ करण्यापेक्षा काही अवयवांसोबत पाय रोज स्वच्छ करावे. पायांवर बाहेरची धुळ, माती साचते, तसेच तुम्ही सॉक्स किंवा शूज वापरत असाल तर याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यताही असते. ज्यामुळे फंगल इन्फेक्शही होऊ शकतं.