शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

MS Dhoni नंतर कतारमध्ये संजू सॅमसनची हवा! फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांनी झळकवले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 9:51 PM

1 / 7
कतारमध्ये फिफा विश्वचषकाचा थरार सुरू आहे. भारतीय फुटबॉल संघ पुन्हा एकदा या विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात अपयशी ठरला आहे. आज मोरक्को विरुद्ध बेल्जियम यांच्यात सामना झाला.या सामन्या दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनची झलक पाहायला मिळाली.
2 / 7
अल थुमामा स्टेडियमवर मोरोक्को आणि बेजियम यांच्यात खेळल्या गेलेल्या ग्रुप एफच्या सामन्यात मोरोक्कोने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेजियमचा 2-0 ने पराभव केला. या सामन्यावेळी एका चाहत्याने स्टेडियमवर मोरक्को आणि बेल्जियम यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनची जर्सी झळकवली.
3 / 7
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात रविवारी चाहत्यांना पुन्हा एकदा धक्कादायक सामना पाहायला मिळाला. अल् थुमामा स्टेडियमवर मोरोक्को आणि बेल्जियम यांच्यात खेळल्या गेलेल्या गट एफ सामन्यात मोठी खेळी झाली.
4 / 7
मोरोक्कोने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमचा 2-0 असा पराभव केला. फिफा क्रमवारीत मोरोक्को हा 22व्या क्रमांकाचा संघ असून युरोपीय संघाविरुद्धचा त्यांचा विजय ऐतिहासिक आहे.
5 / 7
पूर्वार्धात दोन्ही संघांकडून बरेच प्रयत्न झाले पण सामन्याचा पहिला स्कोअर उत्तरार्धात आला. हाफ टाईमच्या काही मिनिटे आधी मोरोक्कोचा सलामीचा गोल व्हीएआरने ऑफसाइडसाठी रद्द केला.
6 / 7
या सामान्यादरम्यान, भारतीय प्रेक्षकांनी भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनची जर्सी झळकवली.
7 / 7
कालच्या सामन्यातील महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. चेन्नई सुपर किंग्जने लुसेल स्टेडियममधील धोनीच्या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये धोनीचा चाहता ब्राझीलच्या चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे. धोनीच्या चाहत्याने यापूर्वी एमएस धोनीला भेटून सेल्फी देखील काढला आहे.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Sanju Samsonसंजू सॅमसन