जगभरातील ब्रेड्सचे एकापेक्षा एक 15 प्रकार; पाहूनच तोंडाला सुटेल पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 18:54 IST2019-05-30T18:44:00+5:302019-05-30T18:54:24+5:30

Bread म्हणा किंवा पाव.... नाहीतर तुम्ही डबल रोटीही म्हणू शकता. आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला हा ब्रेड, जगातील कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी तिथे तुम्हाला सापडेलचं. पण यामध्ये तुम्हाला नक्कीच विविधता आढळून येईल. सर्व देशांमध्ये ब्रेड तयार करण्याची स्वतःची अशी वेगळी पद्धत आहे. कोणी तंदूरमध्ये तयार करतं, तर कोणी ओव्हनमध्ये एवढचं नाही तर प्रत्येक ब्रेडची चवही वेगळीच... जाणून घेऊया जगभरात तयार करण्यात येणाऱ्या ब्रेड्सबाबत...
1. व्हाइट ब्रेड (White Bread)
आपल्याकडे प्रत्येक घरात अगदी सर्रास या ब्रेडचा नाश्त्यामध्ये समावेश करण्यात येतो. याचा वापर जास्त करून सॅन्डविच तयार करण्यासाठी करण्यात येतो.
2. ब्राउन ब्रेड (Brown Bread)
दिसायला ब्राउन रंगाचा असणारा हा ब्रेड 100% गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. कधी-कधी यामध्ये कॅरेमल देखील एकत्र करण्यात येतं.
3. फ्लॅट ब्रेड (Flat Bread)
आपल्या देशामध्ये ज्याला रोटी असं म्हटलं जातं, त्याला फ्लॅट ब्रेड असं म्हणतात.
4. पिटा ब्रेड (Pita Bread)
पिटा ब्रेड एक सिरियन ब्रेड आहे. ज्याला लोक अरबी ब्रेड म्हणूनही ओळखतात. याला जास्त फर्मेंटेड नाही केलं जात. याचा शोध मेसोपोटामियामध्ये करण्यात आला होता.
5. Sour Dough Bread
Sour Dough Bread ला Lactobacilli(बॅक्टेरिया) आणि Yeast च्या मदतीने फर्मेंटेड करण्यात येतं. ऐकण्यासाठी फार विचित्र वाटेल, परंतु चवीला अत्यंत स्वादिष्ट असतो.
6. Baguette
Baguette ब्रेड आपल्या क्रिस्पी क्रस्ट आणि लांबीसाठी ओळखला जातो. हा एक फ्रेंच ब्रेड आहे, ज्यावर वरून खसखस आणि तीळ लावण्यात येतात.
7. Rye Bread
रूसमध्ये मिळणाऱ्या ब्रेडला राय आणि गव्हाच्या पिठापासून तयार करण्यात येतं. याचा रंग डार्क ब्राउन आणि चव थोडीशी आंबट असते.
8. पिझ्झा ब्रेड (Pizza Bread)
नावावरूनच समजतं की, याचा वापर पिझ्झा तयार करण्यासाठी करण्यात येतो. हा ब्रेड जास्त करून गोल आकारात तयार करण्यात येतो.
9. Ciabatta Bread
Ciabatta Bread एक इटालियन ब्रेड आहे. ज्यामध्ये गव्हाचं पिठ आणि ऑलिव्ह ऑइलपासून तयार केलं जातं. याला 1982मध्ये एका बेकरने शोधलं होतं.
10. Focaccia Bread
Focaccia Bread इटलीतील वर्ड फेमस ब्रेड आहे. याचं पिठ पिझ्झाच्या पिठाप्रमाणे असतं. यामध्ये ऑलिव्ह ऑइल, लसूण आणि इतर हर्ब्स एकत्र केले जातात.
11. Brioche
Brioche ब्रेडला अंडी आणि बटरच्या मदतीने तयार करण्यात येतं. हा एक फ्रेंच ब्रेड आहे, जो दिसायला गोल्डन ब्राउन कलरचा असतो.
12. Bagel
Bagel पोलंडमध्ये मिळणारी एक डोनट शेपचा ब्रेड आहे. हा ब्रेड यहूदी समुदायाची मुलं फार पसंत करतात.
13. Pretzel
Pretzel हा एखाद्या गाठीप्रमाणे दिसणारा प्रसिद्ध ब्रेड आहे. हा ब्रेड बौद्ध भिक्षुंनी शोधून काढला होता.
14. Lavash
Lavash एक सॉफ्ट आणि क्रिस्पी ब्रेड आहे, जो तंदूरमध्ये तयार करण्यात येतो. हा ब्रेड सर्वात जास्त पश्चिम आशियामध्ये खाण्यात येतो.
15. Pumpernickel
Pumpernickel हा सुगंधी राईचा वापर करून तयार केला जातो. जो चवीला गोड असतो. याची चव वाढविण्यासाठी यामध्ये अनेकदा Berries एकत्र केल्या जातात.