उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 10:53 AM2019-08-26T10:53:17+5:302019-08-26T11:01:20+5:30

कॉफी आणि चहा हे असे दोन पेय पदार्थ आहेत. जे जगभरामध्ये आवडीने पिण्यात येतात. अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात या पेयांपासून करतात. तर अनेक लोकांना संपूर्ण दिवस चहा-कॉफी पिण्याची सवय असते. एवढचं नाहीतर उपवास असतानाही ही पेय पिण्यात येतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? उपवासा दरम्यान चहा आणि कॉफी पिणं फायदेशीर ठरतं का?

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

भारतामध्ये श्रावण आणि नवरात्रीमध्ये करण्यात येणाऱ्या उपवासाला जास्त महत्त्व देण्यात येतं. कारण हे ऋतूच्या बदलांनुसार असतात. या वातावरणात शरीरामध्ये बॅक्टेरिया आणि वायरल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक बळावतो. तसेच या वातावरणात हाय सॉल्ट, साखर, तेलकट आणि पॅकेज्ड पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण हे आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी असतं. तसेच यासोबतच ड्रिंकिंग आणि स्मोकिंग करणंही टाळणं फायदेशीर ठरतं.

उपवासादरम्यान, अशा पदार्थांचे सेवन करण्यात येतं, जे भूकेवर कंट्रोल करतात आणि मेटाबॉलिज्म वाढवतात. जास्तीत जास्त लोक सिम्पल डाएट घेतात. ज्यामध्ये भाज्या आणि फळं यांचा समावेश करण्यात येतो. उपवासा दरम्यान पाण्याचं महत्त्व आणखी वाढतं. तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलेंन्ससाठी नारळाचं पाणी किंवा दुसऱ्या पेय पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

उपवासादरम्यान कॉफी आणि चहा पिण्याच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत. कॉफी आणि चहा या दोन्ही पेय पदार्थांमध्ये कॅफेन असतं. जे योग्य प्रमाणात घेतलं तर आरोग्यासाठी ते अत्यंत फायदेशीर असतं. परंतु, जर सतत या पदार्थांचं सेवन केलं तर मात्र ते आरोग्यासाठी घातक ठरतं. जास्त कॅफेनमुळे झोप न येण्याची समस्या, ऐंग्जाइटी आणि डिफ्रेशनपर्यंत होऊ शकतं. तसेच साखरेमुळे ब्लड ग्लुकोज लेव्हल वाढते. वजन वाढतं आणि हृदयासाठीही अत्यंत घातक असतं.

उपवास असताना आपलं शरीर डिटॉक्सिफिकेशन मोडमध्ये असतं. त्यामुले यादरम्यान प्रॉसेस्ड आणि साखर असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणं टाळावं. जर तुम्ही उपवास असताना सॉलिड फूड घेत नसाल तर चहा आणि कॉफीमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो.

अनोशापोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडीटी आणि गॅस्ट्रिकची समस्या होऊ शकते. परंतु, जर तुम्ही काही पदार्थांचं सेवन करत असाल तर त्यासोबतच चहा किंवा कॉफीचं सेवन करू शकता.

जर तुम्ही काहीही न खाता उपवास करणार असाल तर एक किंवा दोन कप चहा साखर आणि दूधाशिवाय घेऊ शकता. या ड्रिंक्समध्ये असणारं कॅफेन मर्यादित प्रमाणात घेतल्याने मेटाबॉलिज्म वाढतं. त्याचबरोबर ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफीमुळे भूक कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.