आधी 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाण्याची चर्चा; पण आता ईशा केसकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:20 IST2026-01-13T16:01:33+5:302026-01-13T16:20:03+5:30
'बिग बॉस मराठी ६' मध्ये ईशा केसकर सहभागी होणार अशी चर्चा होती. पण आता ईशाने चाहत्यांना खास आनंदाची बातमी दिली आहे. जाणून घ्या

अभिनेत्री ईशा केसकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ईशा केसकरला 'जय मल्हार' मालिकेतील बाणाईच्या भूमिकेत चांगलीच लोकप्रियता मिळाली.

ईशा केसकर 'बिग बॉस मराठी ६' जाणार अशी चर्चा होती. अशातच ईशा केसकरने 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.

परंतु 'बिग बॉस मराठी ६'मध्ये ईशाने प्रवेश केला नाही. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ईशा केसकर नक्की काय करते, असा प्रश्न सर्वांना पडला.

अशातच ईशा केसकरने सर्वांना गुडन्यूज दिली आहे. ईशाने 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडल्यावर तिच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

ईशा केसकरने 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत कलाची भूमिका साकारली. या मालिकेतील ईशा आणि अक्षर कोठारी या दोघांची जोडी चांगलीच गाजली.

ईशा केसकरचा हा आगामी प्रोजेक्ट मालिका, सिनेमा की एखादी वेबसीरिज आहे, हे मात्र अद्याप कळलं नाही. त्यामुळे ईशा सध्या काय करते याचा खुलासा सर्वांना झाला आहे.

ईशा नक्की कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ईशा केसकरने 'जय मल्हार', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ईशाने 'गर्लफ्रेंड' आणि 'सरला एक कोटी' सिनेमात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली.

















