पावसाळ्यात फॅशन करायचीय? मग हे नक्की लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:40 PM2018-07-17T15:40:19+5:302018-07-17T15:56:01+5:30

पावसात बेभान होऊन भिजणं सगळ्यांनाच आवडतं मात्र कामानिमित्त बाहेर पडायचं असेल आणि नेमका पाऊस आला की सगळ्यांचाच मूड ऑफ होतो. पावसाळ्यात कपड्यांसोबतच केस आणि मेकअप खराब होतो पण मग अशावेळी मान्सून फॅशनचे काही फंडे वापरून कसं सुंदर दिसायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पावसाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं शक्यतो टाळा. कारण ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच पावसात त्यावर एखादा डाग पडल्यास तो पटकन जात नाही.

पावसाचा जोर जास्त असला की, आपली बॅग ही भिजते. बॅगेतील सामान ओलं होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ बॅग वापरा.

पावसाळ्यात पावसाळी चपला वापरा. चामड्याच्या चपला टाळा. कारण त्या लवकर कोरड्या नाहीत.

लॉन्ग स्किर्ट आणि लॉन्ग ट्राऊजर्स वापरू नका कारण हे पाण्यात भिजवून खालच्या बाजूने खराब होतात.

पावसाळ्यात लाइट मेकअप असावा. वॉटरप्रूफ लायनर आणि काजळ वापरा.

पावसात केस मोकळे सोडू नका कारण ते ओले होऊन खराब होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात डेनिमचे कपडे वापरू नका कारण ते लवकर वाळत नाहीत. त्यामुळे शिफॉन किंवा जॉर्जेटसारखे कापड वापरा.

पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे छत्री. बाजारात आकर्षक रंगीबेरंगी छटा असलेल्या सुंदर फ्रिलवाल्या छत्र्या उपलब्ध आहेत त्याचा वापर करा.