आधी सुसाईड नोट लिहून व्हिडीओ बनवला, मग आई-वडिलांसह मुलाने गळफास घेतला, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 11:15 AM2021-12-23T11:15:34+5:302021-12-23T11:22:48+5:30

Crime News: हरियाणामधील जींद येथील नरवाना येथील धनोरी गावातील एका घरामध्ये वडील, आई आणि मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये सापडला. य धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हरियाणामधील जींद येथील नरवाना येथील धनोरी गावातील एका घरामध्ये वडील, आई आणि मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये सापडला. य धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर याची माहिती मिळाल्यानंतर एसपी नरेंद्र बिजरानिया आणि एएसपी कुलदीप सिंह हे घटनास्थळी पोहोचले. तिघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

एसपींनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून तपास सुरू केला आहे. त्यांनी सांगितले की, ४८ वर्षीय ओम प्रकाश, ४५ वर्षीय कमलेश आणि त्यांचा २० वर्षीय मुलगा सोनू अशी मृतांची ओळख पटली आहे. एसपींनी सांगितले की, तिघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याचा तपास केल्यानंतर पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल.

मृत्यूपूर्वी ओमप्रकाश, त्यांची ४५ वर्षीय पत्नी कमलेश आणि २० वर्षीय मुलगा सोनू यांनी पोलिसांबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्याशिवाय सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माझे आई-वडील हे गुन्हेगार नाही आहेत. तसेच नन्हूची हत्या कुणी केली हेही आम्हाला माहिती नाही.

दरम्यान, कुटुंबीयांनी सांगितले की, गढी पोलीस ठाण्याचे प्रभारी पवन कुमार यांनी दुसऱ्या गटासोबत मिळून कुटुंबाला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रस्त केले. त्यामुळे या छळाला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईवाईकांनी केला आहे.

२१ नोव्हेंबर रोजी मृतांच्या कुटुंबातीलच मनीराम ऊर्फ नन्हू नावाची व्यक्ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांच्या तपासादरम्यान, २९ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या मनिराम ऊर्फ नन्हू याचा मृतदेह गोणीमध्ये बांधलेल्या स्थितीत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मृत मनीराम ऊर्फ नन्हूच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी सातत्याने पीडित कुटुंबाला टॉर्चर करण्यात आले. त्यामुळे वैतागून मंगळवारी रात्री ओमप्रकाश, कमलेश आणि सोनू यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले. जिंदच्या एसपींनी सांगितले की, धनोरी गावातील एकाच कुटुंबातील तीन सदस्य हे घरामध्ये गळफास लावलेल्या स्थितीमध्ये सापडले. फॉरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच पुरावे गोळा करण्यात आले. मृत व्यक्तींवर एका व्यक्तीची हत्या केल्याचा संशय होता. या प्रकरणी विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे.