'ट्रुथ अँड डेयर' खेळून बनविला वर्गमैत्रिणीचा अश्लिल व्हिडीओ; नंतर ब्लॅकमेल करू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 09:02 PM2021-02-06T21:02:45+5:302021-02-06T21:11:13+5:30

Crime News Mumbai: पोलीस अधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकारावर पालकांना सावध केले आहे. तुमची मुले काय करतात, एवढा वेळ इंटरनेटवर काय काय पाहतात, काय वापरतात याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

मुंबईतील एका 14 वर्षीय मुलीने एका मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तिने सांगितले की, तो तिला सोशल मीडियावर ब्लॅकमेल करत आहे.

मुलाचे वय 13 वर्षे असून तो तिच्याच वर्गात शिकतो. त्याने अश्लिल व्हिडीओ काढल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच ब्लॅकमेल करत असल्याचेही पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी मुलाला नोटीस पाठविली असून जेव्हा चार्जशीट दाखल केली जाईल तेव्हा मुलांना न्यायालयात हजर रहावे लागणार असल्याचे म्हटले आहे.

तक्रारीनुसार लॉकडाऊनमध्ये एका अनोळखी व्यक्तीकडून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तो पाठविणारा हाच ओळखीचा मुलगा होता. तिने ती अॅक्सेप्ट केली होती.

यानंतर दोघेही बोलू लागले. तिला त्या मुलाची खरी ओळख माहिती नव्हती. लॉकडाऊनमध्ये दोघांनी एका व्हिडीओ कॉलिंग अॅपद्वारे ट्रूथ अँड डेअर गेम खेळला. त्यामुलाने तिला कपडे काढण्यास सांगितले. हा सारा प्रकार तिने स्क्रीन रेकॉर्डिंग ऑप्शनद्वारे शूट केला.

त्याने तिला अनेकदा कपडे उतरविण्यास सांगितले. यानंतर मुलीने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले. या मुलाने तिच्या एका मैत्रिणीला हा व्हिडीओ पाठवून दिला.

त्या मैत्रिणीने देखील त्याला ब्लॉक केले. तसेच पीडित मुलीला याबाबत सांगितले. यानंतर त्या मुलीने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी आय़पी अॅड्रेस ट्रेस केला तेव्हा तो मुलगा त्याच भागात राहत असल्याचे समोर आले, तसेच तो तिच्याच शाळेतील असल्याचे समजले.

पोलिसांनी सांगितले की, जेव्हा हा प्रकार मुलाच्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना देखील धक्का बसला. लॉकडाऊनमध्ये त्या मुलाने त्य़ाच्या खोलीतच सर्वाधिक वेळ घालविला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकारावर पालकांना सावध केले आहे. तुमची मुले काय करतात, एवढा वेळ इंटरनेटवर काय काय पाहतात, काय वापरतात याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.