Airtel plans : एअरटेलचे बेस्ट Prepaid Plans,कमी किमतीत दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:46 PM2022-02-12T12:46:55+5:302022-02-12T12:57:33+5:30

Airtel plans : जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि तुम्हाला 600 रुपयांच्या खाली सर्वोत्तम प्लॅन हवा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

एअरटेल (Airtel) आपल्या युजर्संना अनेक प्रकारचे प्रीपेड प्लॅन (Prepaid Plans) ऑफर करते. यामुळे बर्‍याच वेळा सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन निवडणे खूप कठीण होते. जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि तुम्हाला 600 रुपयांच्या खाली सर्वोत्तम प्लॅन हवा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

एअरटेलच्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा येतो. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस (SMS) आणि अनलिमिटेड कॉल्स देण्यात आले आहेत. याशिवाय, एअरटेलचा 359 रुपयांचा प्लॅन दररोज 2GB डेटासह येतो, ज्यामध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी आहे.

एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स आणि 100 एसएमएस दिले जातात.

याचबरोबर, एअरटेलच्या 265 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा येतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएससोबतच अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा उपलब्ध आहे.

एअरटेलचा 599 रुपयांचा प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सला दररोज 3GB डेटा आणि दररोज 100SMS दिला जातो. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकता.

याशिवाय, एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar आणि Wynk Music सब्सक्रिप्शन देखील देण्यात आले आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.