तुमच्या ‘पीएफ’ अकाउंटला नॉमिनी आहे का? जाणून घ्या, याबाबत सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:15 AM2021-08-24T07:15:11+5:302021-08-24T07:33:21+5:30

PF account : पीएफ अकाऊंटवरील व्यवहार आता ऑनलाइनही करता येतो.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. निवृत्तीनंतर याच निधीतील संचित रक्कम उपयोगाला येत असते.

शिवाय अडीअडचणीच्या काळातही प्रॉव्हिडंट फंड कामाला येत असतो. त्यामुळे या निधीविषयी प्रत्येकाला आस्था असते. मात्र, प्रॉव्हिडंट फंड अकाऊंटला आपल्या पश्चात कोणीतरी नॉमिनी असणे गरजेचे आहे.

४ मार्च १९५२ केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारित देशभरातील साडेचार कोटी कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाऊंट आहे.

पीएफ अकाऊंटवरील व्यवहार आता ऑनलाइनही करता येतो. पूर्वी पीएफ कार्यालयात जाऊन सर्व अर्ज भरून सादर करावे लागत असे. मात्र, आता बहुतांश व्यवहार ऑनलाइन झाल्याने कर्मचाऱ्यांसाठी सोयिस्कर झाले आहे.

पीएफ संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळावरील सर्व्हिस लिंकवर क्लिक करून एम्प्लॉइज सेक्शनमधील ‘फॉर एम्प्लॉइज’ यावर क्लिक करा.त्यानंतर मेंबर यूएएन वा ऑनलाइन सर्व्हिस यावर क्लिक करा.

तुम्हाला लॉग-इन करण्यास सांगितले जाईल. तुमचा टाकून पासवर्ड टाका व क्लिक करा. या ठिकाणी ‘ई-नॉमिनेशन’ हा पर्याय असेल त्यावर क्लिक करून तपशील भरा.

तपशील भरून झाल्यावर ‘सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन’ या पर्यायावर क्लिक करा. ओटीपीसाठी ‘ई-साइन’वर क्लिक करा. ओटीपी आला की तो भरा आणि ई-नॉमिनेशन सबमिट करा.

अनेकदा निवृत्तीनंतर पीएफ अकाऊंटमधील रक्कम काढली जाते. मुलाचा वा मुलीचा विवाह, त्यांचे शिक्षण वा घर खरेदी या कारणांसाठीही पीएफमधून रक्कम काढता येते.

पीएफ अकाऊंट सुरू झाले की त्यावर आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची नोंद करणे आत्यंतिक गरजेचे आहे. अथवा दुर्दैवी घटनेनंतर पीएफ अकाऊंटमधील रक्कम काढणे मुश्कील होऊ शकते.