TATA ची दमदार कामगिरी! ‘या’ कंपनीचे शेअर्स उच्चांकी स्तरावर; १६८ टक्क्यांची नोंदवली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 08:30 AM2021-09-30T08:30:32+5:302021-09-30T08:34:53+5:30

गेल्या एका वर्षात बीएसई निर्देशांक सुमारे ५३ टक्क्यांनी वधारला आहे, तर Tata ग्रुपमधील या कंपनीचे शेअर्स १६८ टक्क्यांनी वाढले.

भारतीय शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतणूकदारांना लाखो कोटी रुपयांचा फायदाही झाला आहे. यातच शेअर मार्केटमध्ये नवनवीन IPO सादर केले जात असल्याचे दिसत आहे.

शेअर बाजारात भागभांडवलदारांनी विक्रीचा सपाटा सुरूच ठेवल्याने काहीशी घसरण पाहायला मिळाली. एकीकडे शेअर मार्केटमध्ये मंदी दिसून आली असताना दुसरीकडे मात्र TATA ग्रुपमधील एका कंपनीने दमदार कामगिरी नोंदवत शेअर्समधील तेजी कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.

TATA ग्रुपमधील ती कंपनी म्हणजे Tata Power असून, याचे शेअर्स तेजीत असल्याचे दिसून आले. टाटा पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १४५.४० रुपये आहे. टाटा पॉवर शेअर्सची ५२ आठवड्यांची एक्झिट लेव्हल ५१.६५ रुपये आहे.

इक्विटीवरील परताव्याबद्दल बोलायचे झाले, तर Tata Power चे शेअर्स सध्या ५.४१ टक्के परतावा देत आहेत. टाटा पॉवरच्या १७ लाखांहून अधिक शेअर्सची विक्री झाली. स्टॉकच्या बीटा मूल्याबद्दल बोलायचे झाले, तर ते १.७३ वर आहेत.

कोणत्याही स्टॉकचे बीटा मूल्य हे त्याच्या शेअर्सचे चढ-उतार दर्शवते. गेल्या एका वर्षात बीएसई सेन्सेक्स सुमारे ५३ टक्क्यांनी वधारला आहे, तर Tata Power चे शेअर्स १६८ टक्क्यांनी वाढले आहेत.

Tata Power कंपनी लिमिटेडच्या शेअर्सने बाजारात ३.३८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. बाजार सुरू होताच टाटा पॉवरचा शेअर १४५ रुपयांच्या जवळ पोहोचला होता. टाटा पॉवरच्या शेअर्समध्येही १३८.८० रुपयांपर्यंतची निच्चांकी पातळीही दिसून आली होती.

जागतिक बाजारात प्रचंड विक्री आणि एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्सला नुकसान सोसावे लागले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी मंगळवारी १,९५७.७० कोटी रुपयांचे समभाग विकले.

आशियातील इतर प्रमुख स्टॉक एक्स्चेंजमध्ये शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सेऊल या शेअर बाजारांना मध्य-सत्रातील सौद्यांमध्ये प्रचंड तोटा झाला. या दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड १.५१ टक्क्यांनी घसरून ७७.१७ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.

Tata Power च्या समभागांचे मूल्य वाढल्याने कंपनीचे बाजारमुल्य देखील ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. टाटाच्या या शेअरने वर्षभरात लोकांचा पैसा डबल केला आहे. टाटा पॉवर ही नफ्यातील कंपनी आहे.

Tata Power चे उत्पन्नही वाढले आहे. एप्रिल-जून २०२१ मधील कंपनीची एकूण कमाई ५५ टक्के वाढून १०,१४५.८९ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीचे उत्पन्न ६,५४०.४२ कोटी रुपये होते. Tata Power गेल्या पाच तिमाहींमध्ये फायद्यात आहे.

Tata Power च्या फ्यूचर प्लॅनबाबत कंपनीचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा यांचे म्हणणे आहे की, ते रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलियोच्या स्तराला वाढवणार आहोत. कंपनी ४ गीगावॅटवरून २०२५ पर्यंत १५ गीगावॅट आणि २०३० पर्यंत २५ गीगावॅटपर्यंत नेण्यात येणार आहे.

यामुळे रिन्यूएबल एनर्जी मधील वाटा ३१ टक्क्यांनी वाढून ८० टक्क्यांवर जाणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.