राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरनं केली कमाल, 40 रुपयांवरून पोहोचला 2700 रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:07 PM2022-08-03T13:07:26+5:302022-08-03T13:21:40+5:30

या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावाही दिला आहे. आज या शेअरची किंमत प्रचंड वाढली आहे.

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आहेत. बाजारातील छोटे-मोठे गुंतवणूकदारही त्यांचा पोर्टफोलिओ अनेक वेळा फॉलो करताना दिसतात. राकेश झुनझुनवाला यांनी पूर्वी एक असा शेअर खरेदी केला होता, ज्याने त्यांचे नशीबच पालटले. हा शेअर आज मल्टीबॅगर कॅटेगरीत सामील झाला आहे.

या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावाही दिला आहे. आज या शेअरची किंमत प्रचंड वाढली आहे. या शिवाय शेअर बाजारात इतरही अनेक सेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यातच राकेश झुनझुनवाला यांनी खरेदी केलेल्या या शेअरचाही समावेश आहे.

या ठिकाणी आम्ही आपल्याला टायटनच्या (Titan Company) शेअरसंदर्भात माहिती देत आहोत. टाइटनच्या शेअरने कमी काळातच गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यातच, टायटनचा शेअर स्लिप झाल्याचेही बघायला मिळाले आहे. तसेच चार्टचा विचार करता, 2009 मध्ये हा शेअर केवळ 40 रुपयांपेक्षाही कमी दरात मिळत होता.

तेव्हा किती रुपेये होती या शेअरची किंमत - 13 मार्च 2009 रोजी टायटनचा शेअर 36.04 रुपयांनाच मिळत होता. मात्र, आता या शेअरची किंमत 2000 रुपयांवर पोहोचली आहे. याच बरोबर टायटनच्या शेअरची 52 आठवड्यांतील हाय आणि ऑल टाइम हाय किंमत 2768 रुपये एवढी आहे.

सध्या या शेअरची किंमत (3 ऑगस्त 2022) 2365 रुपयांच्या जवळपास आहे. तसेच टायटनच्या शेअरची 52 आठवड्यांतील सर्वात कमी किंमत 1763.20 रुपये एवढी आहे.

तेजी कायम - 1 जानेवारी 1999 रोजी टायटनच्या शेअरची किंमत 4.27 रुपये एवढी होती. तेव्हापासून शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसत आहे. तसेच आतासुद्धा टायटनच्या शेअरमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)