याला म्हणतात रिटर्न! २० पैशांचा शेअर १०७₹वर; १ लाखाचे झाले ५ कोटी; ‘या’ कंपनीने केले मालमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:02 PM2022-11-02T12:02:22+5:302022-11-02T12:08:19+5:30

Share Market Multibagger Stock: शेअर मार्केटमधील या कंपनीने दिवाळीनंतरही गुंतवणूकदारांची दिवाळी केल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही घेतलाय का हा शेअर? जाणून घ्या...

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार होताना दिसत आहेत. असे असले तरी शेअर बाजारात नव्याने एन्ट्री घेणाऱ्या कंपन्यांची संख्याही उत्तम आहे. गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. (share market investment)

यातच काही कंपन्या आपल्या कमाल कामगिरीच्या जोरावर भन्नाट रिटर्न्स देत असून, यामुळे गुंतवणूकदार चांगलेच मालमाल होताना दिसत आहेत. यापैकी एक कंपनी म्हणजे Bharat Electronics Ltd. या कंपनीच्या शेअरने रॉकेट स्पीड पकडलेला असून, गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांची दिवाळी केल्याचे सांगितले जात आहे. (share market multibagger stock)

शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा दिला आहे. या परताव्यामुळे अनेक गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना अनेक पट परतावा देणारा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखला जातो. Bharat Electronics Ltd कंपनी या गटात मोडते.

या कंपनीच्या समभागाने मजबूत वाढीच्या बळावर गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. एवढेच नव्हे तर या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. एक काळ असा होता जेव्हा या शेअरची किंमत १ रुपयापेक्षा कमी होती. मात्र, आता या शेअरची किंमत १०७ रुपयांच्या पुढे गेली आहे.

१ जानेवारी १९९९ रोजी NSE वर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) शेअरची किंमत २२ पैसे होती. ५ फेब्रुवारी १९९९ रोजी हीच किंमत १८ पैशांवर आली. ४ जून १९९९ रोजी या शेअरची २० पैसे झाली. हळूहळू या स्टॉकमध्ये वाढ होत गेली आणि फेब्रुवारी २००० मध्ये या कंपनीच्या शेअरने १ रुपयाची पातळी गाठली.

मंदगतीने प्रगती करत असताना सन २००५ मध्ये प्रथमच शेअरची किंमत १० रुपयांच्या पुढे गेली. आताच्या घडीला या कंपनीचा शेअर १०७ रुपयांच्या पुढे गेला आहे. या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा सर्वोच्च स्तर NSE वर रु. ११४.६५ इतका उच्चांक आहे. तर नीचांकी स्तर ६१.१५ रुपये राहिला.

दुसरीकडे, १९९९ मध्ये जर एखाद्याने या शेअरमध्ये एक लाख रुपये २० पैशांनी गुंतवले असतील, तर त्या गुंतवणूकदाराला ५ लाख शेअर्स मिळाले असते. दुसरीकडे त्या पाच लाख शेअर्सची किंमत १०० रुपयांनुसार पाहिली तर त्या शेअर्सची किंमत आता पाच कोटी रुपये झाली असती.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंगळवारी देशाचे पहिले डिजिटल चलन सुरू केले. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) असे या चलनाचे अधिकृत नाव असून पथदर्शक प्रकल्पांतर्गत ते जारी करण्यात आले आहे.

डिजिटल चलने ‘सीबीडीसी होलसेल’ आणि ‘सीबीडीसी रिटेल’ अशी २ प्रकारची आहेत. मंगळवारी सुरू झालेले सीबीडीसी हे होलसेल श्रेणीतील आहे. याचा वापर बँका, बिगर बँक वित्तीय कंपन्या आणि अन्य मोठ्या संस्था करतील. त्यानंतर ‘सीबीडीसी रिटेल’ जारी होईल. त्याचा वापर सामान्य लोक करू शकतील.