मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा पहिला फायनलिस्ट संघ आज आपल्याला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 07:39 PM2024-05-21T19:39:10+5:302024-05-21T19:39:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : Travis Head dismissed for a 2 ball duck, WHAT A BALL BY  MITCHELL STARC, Video  | मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 

मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा पहिला फायनलिस्ट संघ आज आपल्याला मिळणार आहे. कोलकाता नाईटर रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला Qualifier 1 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचा फॉर्म पाहता कोणता संघ बाजी मारेल याचा अंदाज आताच बांधणे अवघड आहे. KKR ने २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर SRH १७ गुणांसह नेट रन रेटच्या जोरावर क्वालिफायर १ मध्ये पोहोचले आहेत. SRH चा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून KKR समोर तगडे लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतला. 


गेल्या काही दिवसांतील देशातील हवामान पाहता, याही सामन्यावर पावसाचे सावट होते. पण, वेळेत नाणेफेक झाल्याने चाहते आनंदित झाले.  KKR च्या क्वालिफायर १ मध्ये विजयाची टक्केवारी ही १०० % आहे. त्यांनी २०१२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर १८ धावांनी, तर २०१४ मध्ये पंजाब किंग्सवर २८ धावांनी विजय मिळवला होता. पण, प्ले ऑफमध्ये हे संघ तीनवेळा समोरासमोर आले होते आणि त्यापैकी दोनवेळा ( एलिमिनेटर, २०१६ व क्वालिफायर २, २०१८) हैदराबादने बाजी मारली आहे. 


पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा नॉन स्ट्रायकर एंडला रन आऊट होण्यापासून वाचला. श्रेयस अय्यरचा डायरेक्ट हीट KKR विकेट मिळवून देणारा ठरला असता. पण, मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर SRH चा ओपनर ट्रॅव्हिस हेड याचा त्रिफळा उडवला. सलग दुसऱ्या सामन्यात हेड भोपळ्यावर बाद झाला. प्ले ऑफमध्ये भोपळ्यावर बाद होणारा तो SRH चा चौथा सलामीवीर ठरला. राहुल त्रिफाठीने दोन चौकार खेचून हैदराबादवरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : Travis Head dismissed for a 2 ball duck, WHAT A BALL BY  MITCHELL STARC, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.