21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 07:47 PM2024-05-21T19:47:38+5:302024-05-21T19:55:20+5:30

विवाहितेच्या लग्नाला आजच एक महिना झाला असून आजच तिची अंत्ययात्रा घरातून निघाली. लग्नानंतर महिनाभरातच तिची हत्या झाली.

bihar nalanda husband killed wife for opposing love affair | 21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

फोटो - ABP News

बिहारच्या नालंदा येथील बेन पोलीस स्टेशन हद्दीतील धारनी धाम गावात मंगळवारी (21 मे) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या लग्नाला आजच एक महिना झाला असून आजच तिची अंत्ययात्रा घरातून निघाली. लग्नानंतर महिनाभरातच तिची हत्या झाली. नववधूला मारणारा तिचा नवराच आहे. बायकोची हत्या केल्यावर तो मृतदेह बेडवर टाकून पळून गेला. सकाळी मुलगी न उठल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि शेजारी घरी गेले असता त्यांना ती मृतावस्थेत आढळून आली.

शेजाऱ्यांनी विवाहितेच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना दिली आणि त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह चुनचुन रामची 20 वर्षीय पत्नी काजल कुमारीचा असल्याचं समजलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवला आहे. घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. घरात फक्त पती-पत्नी राहत होते, असे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.

काजल कुमारीच्या नातेवाईक रेणू देवी यांनी सांगितलं की, काजलने रात्री 9 वाजता फोन करून तो तिला जीवे मारणार असल्याचं सांगितलं होतं. दोन दिवसांपासून वाद सुरू होता. काजलने असंही सांगितलं की, तिच्या पतीचे एका मुलीसोबत संबंध आहेत आणि सतत तिच्याशी फोन, व्हिडिओ कॉलवर बोलतो. तिला हा प्रकार समजल्यावर तिला मारहाण करण्यात आली. पतीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने काजलची हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "हत्येची माहिती गावातील एका शेजाऱ्याकडून मिळाली होती. माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीतून मृतदेह बाहेर काढला. कुटुंबीयांनी सांगितलं आहे की, हे लग्न गेल्या महिन्यात झालं होतं. मुलाचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत आणि त्याची चौकशी केली जात आहे.”
 

Web Title: bihar nalanda husband killed wife for opposing love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.