SBI customers ALERT: बँक उघडण्याची, बंद होण्याची वेळ बदलली, होणार फक्त चार कामं; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 01:45 PM2021-05-19T13:45:25+5:302021-05-19T13:51:40+5:30

State Bank Of India : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर State Bank of India नं केले काही महत्त्वाचे बदल.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका मात्र टळलेला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सातत्यानं पावलं उचलत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेनं आता आपल्या ब्रान्च उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा बदलल्या आहेत.

ब्रान्चच्या वेळांव्यतिरिक्त आता बँकेत ठराविक चार कामंच केली जाणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली.

ग्राहकांना अतिशय आवश्यक काम असेल तर त्यांनी बँकेमध्ये यावं असं ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात सांगण्यात आलं आहे.

याशिवाय ग्राहकांनी ३१ मे पर्यंत सकाळी १० ते १ या दरम्यानच बँकेत यावं, २ वाजता सर्व शाखांमधील कामकाज बंद होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

स्टेट बँकेच्या शाखा आता सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीतच खुल्या राहतील, असं बँकेनं ट्विटरद्वारे सांगितलं आहे.

तसंच बँकेची प्रशासनिक कार्यालयं ५० टक्के कर्मचाऱ्यांसह पहिल्याप्रमाणे पूर्ण बँकिंगच्या वेळेत उपलब्ध राहतील, असंही सांगण्यात आलं आहे.

बँकेत येणआऱ्या ग्राहकांसाठी प्रेवश करताना मास्क परिधान केलेलं असणं बंधनकारण करण्यात आलं आहे. त्याशिवाय ग्राहकांना बँकेत प्रवेश दिला जाणार नाही.

स्टेट बँकेनं ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत आता चारच कामं केली जाणार आहेत.

यामध्ये रोख रक्कम काढणं अथवा भरणं, चेकशी निगडीत कामं, DD-RTGS-NEFT शी निगडीत कामं आणि सरकारी चालान इतकीचं कामं केली जातील.

स्टेट बँकेनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना फोन बँकिंग सेवेचा फायदा घेता येणार आहे.

फोन बँकिंग सेवा सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना नोंदणी करणँ आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकांना पासवर्ड तयार करावा लागतो.

ग्राहक संपर्क केंद्राच्या माध्यमातून फोनवर बँकेशी निगडीत माहिती मिळवता येऊ शकते.

तसंच चेकबुक हवं असल्यास घसबसल्याही ते मागवता येणं शक्य आहे.