615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:34 PM2023-08-25T13:34:53+5:302023-08-25T14:45:16+5:30

चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर, अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. यात सौदी अरेबिया, सिंगापूर आणि साऊथ कोरियाचा समावेश आहे.

भारताने केवळ 615 कोटी रुपयांत तयार केलेले चंद्रयान-3 (Chandrayaan-3) चांद्राच्या पृष्ठभागावर उतरवून जगाला चकित केले आहे. मात्र, भारताच्या यशाने एअरोस्पेसशी संबंधित देशांतर्गत कंपन्यांची चांदी केली आहे. याच आठवड्यात चार व्यवहाराच्या दिवसांत स्पेसशी संबंधित 13 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 30,700 कोटी रुपयांची तेजी आली आहे.

इस्रोला (ISRO) क्रिटिकल मॉड्यूल्स आणि सिस्टिम्स सप्लाय करणाऱ्या सेंटम इलेक्टॉनिक्सच्या शेअर्समध्ये या आठवड्यात 26 टक्क्यांची तेजी आली आहे. याच प्रकारे Avantel, Linde India, पारस डिफेन्स आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअरमध्येही डबल डिजिट तेजी आली आहे.

महत्वाचे म्हणजे, दिग्गज एफएमसीजी कंपनी गोदरेज इंडस्ट्रीजचा शेअरदेखील 8 टक्क्यांनी वधारल्याचे दिसत आहे. गुंतवणूकदरांना वाटले की, इस्रोला क्रिटिकल कंपोनंट्स सप्लाय करणारी गोदरेज एअरोस्पेस ही तिची सब्सिडरी कंपनी आहे. मात्र कंपनीने स्पष्ट केले आहे की, गोदरेज एअरोस्पेसचा त्यांच्याशी कासलाही संबंध नाही.

चंद्रयान-3 मिशनमध्ये योगदान देणाऱ्या कंपन्यांची यादी मोठी आहे. यात अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांचा समावेश आहे. लार्सन अँड टुब्रोने सबसिस्टिम्स तयार करण्यापासून मिशन ट्रॅकिंगमध्येही योगदान दिले आहे. तर मिश्र धातू निगमने लॉन्च व्हेइकल एलव्हीएम-3 एम-4 साठी क्रिटिकल मटेरिअलचा सप्लाय केला.

तसेच, पीटीसी इंडस्ट्रीजने चंद्रयान-3 साठी पंप इंटरस्टेज हाउसिंगचा पुरवठा केला. तर एमटीएआरने विकास इंजिन, क्रायोजेनिक इंजिन सबसिस्टिम्सचा पुरवठा केला. तर पारसने मिशनसाठी नेव्हिगेशन सिस्टिम दिले. तर बीएचईएलने टायटॅनियम टँक आणि बॅटरी सप्लाय केला.

चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगातील स्पेस इंडस्ट्रीजचे लक्ष भारताकडे आकर्षित झाले आहे. सध्या ग्लोबल स्पेस मार्केट हे 447 अब्ज डॉलरचे आहे. मात्र यात भारताचा वाटा फार कमी आहे.

अनेक देशांनी संपर्क साधला - चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर, अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. यात सौदी अरेबिया, सिंगापूर आणि साऊथ कोरियाचा समावेश आहे.

कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्टर पीयूष गोयल यांनीही याची पुष्टी केली आहे. अनेक देशांनी भारतासोबत स्पेस सेक्टरमध्ये भागिदारीसाठी संपर्क केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला.

याच वेळी, यामुळे सायंटिफिक डिस्कव्हरीच्या नव्या संधी निर्माण होतील. भारत जगाच्या स्पेस कम्यूनिटीत मोठ्या प्रमाणावर योगदान देईल, असेही गोयल यांनी म्हटले आहे.