'Rolex' नाव तर ऐकलंच असेल! लहानपणीच झाले पोरके; परिस्थितीशी दोन हात कर उभी केली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 08:47 AM2024-01-19T08:47:10+5:302024-01-19T09:04:22+5:30

स्टाईल, फीचर्स आणि किंमतीमुळे रोलेक्स कंपनीने बनवलेली घड्याळे अनेक दशकांपासून श्रीमंत लोकांची पहिली पसंती राहिली आहेत.

रोलेक्स (Rolex) या कंपनीची घड्याळं अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात. स्टाईल, फीचर्स आणि किंमतीमुळे रोलेक्स कंपनीने बनवलेली घड्याळे अनेक दशकांपासून श्रीमंत लोकांची पहिली पसंती राहिली आहेत. या ब्रँडची किंमत सर्वांनाच माहिती आहं. परंतु हा ब्रँड कोणी, कधी आणि कसा सुरू केला याची कल्पना मात्र फार कमी लोकांना आहे.

रोलेक्स कंपनीची स्थापना करणारी व्यक्ती काही श्रीमंत नव्हती. बालपणी आई वडिलांचं छत्र हरपलेल्या जर्मनीच्या हॅन्स विल्सडॉर्फ यांनी इंग्लंडमधील लंडनमध्ये आल्फ्रेड डेव्हिस यांच्यासह रोलेक्सचा पाया रचला. घड्याळांचं जग पूर्णपणे बदलण्याचे श्रेयही हंस यांना जाते. त्यांनीच जगातील पहिलं मनगटाचं घड्याळ बनवलं होतं.

२२ मार्च १८८१ रोजी जर्मनीतील कुलम्बाच येथे जन्मलेल्या हॅन्स विल्सडॉर्फ हे १२ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरुन आई आणि वडिलांचं छत्र हरपलं. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी कोणतीही बचत ठेवली नव्हती. हन्स आणि त्यांचा भाऊ आणि बहिणीची जबाबदारी त्यांच्या काकांवर पडली. त्याच्या काकांनी हन्स यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी हन्स यांच्या वडिलांची मालमत्ता विकली. सुशिक्षित असणं महत्त्वाचं आहे, असं काकांचं मत होतं.

दुसऱ्या ठिकाणाहून आल्यामुळे हन्स यांना त्यांच्या शाळेतील वर्गमित्रांनी खूप त्रास दिला. त्यांना टोमणेही मारले. पण, आयुष्यात काहीतरी बनण्याची इच्छा त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. आपल्या वर्गमित्रांकडून त्रास होत असला तरी मन लावून अभ्यास करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. भाषा आणि गणितावर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. ते शाळेतील हुशार विद्यार्थीही होते.

दुसऱ्या ठिकाणाहून आल्यामुळे हन्स यांना त्यांच्या शाळेतील वर्गमित्रांनी खूप त्रास दिला. त्यांना टोमणेही मारले. पण, आयुष्यात काहीतरी बनण्याची इच्छा त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. आपल्या वर्गमित्रांकडून त्रास होत असला तरी मन लावून अभ्यास करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. भाषा आणि गणितावर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. ते शाळेतील हुशार विद्यार्थीही होते.

वयाच्या १९ व्या वर्षी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर हन्स नोकरीच्या शोधात स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात आले. त्यांनी जिनिव्हा येथील पर्ल कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर त्यांना कुनो कॉटन नावाच्या प्रसिद्ध घड्याळ कंपनीत नोकरी मिळाली. इथेच ते पहिल्यांदा घड्याळांच्या जगासमोर आले. त्यांनी घड्याळांची अचूकता तपासणे आणि पॅकेजिंगचं काम करणं सुरू केलं. येथे त्यांनी घड्याळ बनवण्याची कला आत्मसात केली. त्यांचं काम चांगलं चाललं होतं, पण सक्तीची लष्करी सेवा करण्यासाठी त्यांना परत जर्मनीला जावं लागलं.

सैन्यात सेवा केल्यानंतर, हन्स वयाच्या २२ व्या वर्षी इंग्लंडला गेले. त्यांना घड्याळ कंपनीत काम करण्याचा अनुभव होता. त्यामुळे त्याला एका घड्याळ कंपनीत चांगली नोकरी मिळाली. त्यांचं विक्री वाढवण्याचं काम होतं. हन्स यांनी दोन वर्षे कठोर परिश्रम करून कंपनीची विक्री दुप्पट केली. नोकरीसोबतच स्वत:ची घड्याळ बनवणारी कंपनी सुरू करण्याच्या पद्धतीही ते शिकत होता. लंडनमध्येच त्याची फ्लॉरेन्स फ्लोरिस मध्ये क्रुटी नावाच्या मुलीशी भेट झाली. नंतर हन्स यांनी तिच्याशी लग्न केलं.

१९०५ मध्ये, हन्स यांनी आपल्या मेहुण्याकडून पैसे घेतले आणि विल्सडॉर्फ अँड डेव्हिस नावाची घड्याळ निर्मिती कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी स्विस कंपनीशी भागीदारी केली. ते स्विस कंपनीचे पार्ट इंग्लंडला आणायचे, एकत्र करायचे, घड्याळे बनवायचे आणि विकायचे. त्यांचं काम चांगलं चाललं होतं. त्या काळात पुरुष मनगटावर घड्याळ घालत नसत. तो घड्याळ खिशात ठेवायचे. वेळ तपासण्यासाठी पुन्हा पुन्हा खिशातून घड्याळ काढावं लागायचं. काही काळानंतर त्यांनी पुरुषांसाठी मनगटाचे घड्याळ बनवलं. १९०८ पर्यंत, त्यांचे मनगटाची घड्याळं इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाली.

हन्स यांना त्याच्या कंपनीचं नाव आवडले नाही. हे नाव मोठं होतं आणि सहज उच्चारलं जात नव्हते. त्यांना घड्याळाच्या डायलवर बसेल असं छोटं नाव हवे होते. एके दिवशी ते लंडनमध्ये कुठेतरी जात होता. तेवढ्यात त्यांना एक आवाज आला. रोलेक्स... आणि हॅन्सला त्याच्या घड्याळाला एक नवीन नाव मिळालं. १९०८ मध्ये त्यांनी याची नोंदणी केली आणि या ब्रँड नावानं घड्याळे विकण्यास सुरुवात केली.

पहिल्या महायुद्धात रोलेक्स घड्याळं खूप प्रसिद्ध झाली. सैनिकांना ती खूप आवडली. हातावर बांधल्यामुळे वेळ सहज दिसत होती. ती अगदी अचूक वेळ सांगायची. शिवाय, ते प्रत्येक प्रकारच्या हवामानातही उत्तम काम करत होती. १९१४ मध्ये रोलेक्सचे मुख्य कार्यालय लंडनमध्ये बांधले गेले. रोलेक्सला स्वित्झर्लंडकडून रिस्टवॉच क्रोनोमीटरचे प्रमाणपत्रही मिळालं. लंडन केव्ह ऑब्झर्व्हेटरीकडून 'ए' प्रमाणपत्रही मिळालं. १९१९ मध्ये काही समस्यांमुळे हॅन्स यांनी रोलेक्सचं मुख्यालय जिनिव्हा येथे आणलं.

हॅन्स यांनी ऑयस्टर घड्याळांमध्ये सुधारणा करणं सुरू ठेवलं. १९३१ मध्ये, रोलेक्सनं ऑयस्टर प्रीसिपिटेटर लाँच केलं, ज्याला चावीची आवश्यकता नव्हती. रोलेक्स डेट वन १९४५ मध्ये लाँच करण्यात आलं. हे जगातील पहिलं घड्याळ होते जे फक्त वेळच नाही तर तारीख देखील सांगायचं. रोलेक्स डे डेट १९५५ मध्ये लाँच करण्यात आलं. हे जगातील पहिले घड्याळ होतं जे दिवसासोबतच वेळ आणि तारीख सांगायचं. हॅन्स विल्सडॉर्फ यांचं १९६० मध्ये निधन झालं. मृत्यूपूर्वीच त्यांनी रोलेक्सचा सर्व व्यवसाय त्यांच्या पत्नीच्या नावानं स्थापन केलेल्या 'हंस विल्सडॉर्फ फाउंडेशन' या ट्रस्टकडे हस्तांतरित केला होता. त्याच्या मृत्यूनंतर, रोलेक्स पूर्णपणे लक्झरी घड्याळ तयार करणारी कंपनी बनली.