Jioचा जबरदस्त प्लॅन! २० रुपये कमी देऊन मिळवा २८ दिवसांची अतिरक्त वैधता, २८ जीबी अधिक डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:14 AM2022-01-12T10:14:20+5:302022-01-12T10:22:04+5:30

Reliance Jio : काही दिवसांपूर्वीच सर्वच दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या (Prepaid Recharge Plans) किंमतीत केली होती मोठी वाढ.

सध्या अनेक दूरसंचार कंपन्या (Telecom Companies) आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी आणि आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. रिलायन्स जिओचे प्रीपेड प्लॅन्स (Reliance Jio Prepaid Plans) अन्य दूरसंचार कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत थोडे स्वस्त आहेत.

रिलायन्स जिओनेही काही दिवसांपूर्वी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा मोबाईल रिचार्जवरचा खर्च आता वाढला आहे. पण, जर तुम्ही थोडीशी 'तडजोड' केलीत, तर तुम्ही कमी पैशातही जास्त डेटा आणि वैधतेचा फायदा घेऊ शकता.

आम्ही रिलायन्स जिओच्या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल सांगत आहोत. या दोन प्लॅनमधील किंमतीत 20 रुपयांचा फरक आहे. 20 रुपये कमी देऊन या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची अतिरिक्त वैधता आणि 28GB अधिक डेटा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया जिओचे हे दोन प्लान कोणते आहेत आणि त्यात काय फायदे आहेत.

आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या 479 रुपये आणि 499 रुपयांच्या प्लॅन्सबद्दल सांगत आहोत. दोन्ही प्लॅन्समध्ये केवळ 20 रुपयांचं अंतर आहे. परंतु कमी पैशांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अधिक डेटा आणि व्हॅलिडिटी मिळत आहे.

Jio च्या 479 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो, त्यानुसार ग्राहकांना एकूण 84GB डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट 64 Kbps वेगाने चालते. वैधतेबद्दल सांगायचं झाल्यास, या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता देण्यात येते.

या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. SMS बद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये दररोज 100SMS मिळतात. यासोबत JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे.

रिलायन्स जिओच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. दैनिक 2GB डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps इतका देण्यात येतो. या प्लॅनमध्ये एकूण 56GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जातात.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा उपलब्ध असून २८ दिवसांची वैधता देण्यात येते. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देण्यात येते. त्याच वेळी, या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चं एका वर्षासाठी सबस्क्रिप्शन दिलं जाते.

20 रुपयांच्या फरकासह या प्लॅनमध्ये डेटा आणि वैधतेमध्येही फरक आहे. जिथे 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता मिळते. तर 599 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे. अशा प्रकारे तुम्हाला 20 रुपये कमी खर्च करून 28 दिवसांची अधिक वैधता मिळेल.

वैधतेसोबतच, दोन्ही प्लॅनमध्ये डेटामध्ये खूप फरक आहे जिथे 479 रुपयांच्या प्लानमध्ये 84GB डेटा उपलब्ध आहे, तर 499 रुपयांच्या प्लानमध्ये 56GB डेटा देण्यात येतो. तुम्हाला 20 रुपये कमी खर्च करून 28GB अतिरिक्त डेटा मिळेल. आणखी एक फरक म्हणजे 499 रुपयांच्या प्लॅनसह, तुम्हाला 1 वर्षासाठी Disney + Hotstar चं सबस्क्रिब्शन मिळणार आहे.