शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Anil Ambani यांची Reliance Capital पुन्हा बॉन्डधारकांचं व्याज फेडण्यात ठरली अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 7:27 PM

1 / 15
अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कॅपिटल पुन्हा एकदा बॉन्डधारकांना व्याज देण्यात अयशस्वी ठरली.
2 / 15
रिलायन्स कॅपिटलला २२ एप्रिल रोजी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सवर (एनसीडी) व्याजाचा भरणा करायचा होता.
3 / 15
स्टॉक एक्सचेंजला देण्यात आलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली आहे. ही रक्कम किती होती याचा खुलासा होऊ शकला नाही.
4 / 15
परंतु डिसेंबर २०२० च्या तिमाहीतील उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार कंपनीनं १४,८२७ कोटी रुपयांच्या एनसीडीची यादी केली होती.
5 / 15
याशिवाय एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या दोन्ही बँकांचं हप्तेही फेडण्यास कंपनी बाराव्यांदा अपयशी ठरली आहे.
6 / 15
रिलायन्स कॅपिटलने यापूर्वी त्याच्या प्रमुख मालमत्तांसाठी एक्सप्रेशन्स ऑफ इंटरेस्ट (ईओआय) मागवले होते.
7 / 15
काही कायदेशीर समस्यांमुळे कंपनी आपल्या मालमत्तांचं मॉनिटायझेशन करू शकत नाही. त्यामुळे कंपनी कर्ज फेडण्यास अपयशी ठरत आहे, असं कंपनीनं दिलेल्या माहितीद्वारे सांगितलं.
8 / 15
शेअर बाजाराला देण्यात आलेल्या माहितीनुसार मालमत्तांच्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे त्यांना समस्यांना समोरं जावं लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
9 / 15
रिलायन्स कॅपिटल एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेकडे परतफेड करण्यात येणारा हप्ता बाराव्यांदा फेडण्यास अपयशी ठरली आहे.
10 / 15
या हप्त्यांची परतफेड कंपनीला जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान करायची होती. रिलायन्स कॅपिटल एचडीएफसीला दरमहा ४.७७ कोटी रूपये आणि अ‍ॅक्सिस बँकेला ७१ लाख रुपयांचा हप्ता भरण्यात सतत अपयशी ठरत आहे.
11 / 15
कंपनीनं एचडीएफसीकडून ५२४ कोटी आणि अॅक्सिस बँकेकडून १०१ कोटींचं कर्ज घेतले होतं.
12 / 15
एचडीएफसी बँक कर्जावर वर्षाला १०.६ टक्के ते १३ टक्के आणि अॅक्सिस बँक वर्षाला ८.२५ टक्के दरानं व्याज आकारत आहे.
13 / 15
रिलायन्स कॅपिटलवर बँक आणि अन्य आर्थिक संस्थांचे ७११ कोटी रूपयांचे कर्ज आहे. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी कंपनीवर एकूण आर्थिक थकबाकी २०,६४३ कोटी रुपये होती.
14 / 15
डिसेंबर २०२० च्या तिमाहीत कंपनीचा तोटा ४०१८ कोटी रुपयांवर पोहोचला होता. तर एका वर्षापूर्वी डिसेंबर २०१९ च्या तिमाहीत कंपनीला १३५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
15 / 15
कंपनीच्या व्याजातून मिळणारं उत्पन्नही डिसेंबर २०१९ मध्ये १४०० कोटी रुपयांवरून घसरून डिसेंबर २०२० मध्ये ६८४ कोटी रुपये झालं.
टॅग्स :Relianceरिलायन्सAnil Ambaniअनिल अंबानीhdfc bankएचडीएफसीbankबँकMONEYपैसाshare marketशेअर बाजार