Join us  

Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा डोंगर उभा राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 5:53 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा डोंगर उभा राहिला. आयपीएल इतिहासात प्रथमच सलग तीन सामन्यांत २५० हून धावा चोपल्या गेल्या. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावांचा विक्रम नोंदवताना मुंबई इंडियन्ससमोर तगडे लक्ष्य उभे केले. इशान किशन व रोहित शर्मा यांच्याकडून MIला तशाच उत्तराची अपेक्षा होती. पहिल्याच षटकात रोहित व रिषभ पंत यांच्यात धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली. 

जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 

२२ वर्षाच्या Jake Fraser-McGurk ने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. त्याने २७ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावा कुटल्या आणि अभिषेक पोरेलसह ( ३६) पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ११४ धावा फलकावर चढवल्या. शे होप व रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. होपने १७ चेंडूंत ५ षटकारांसह ४१ धावा केल्या. DC ने १५ षटकांत १९० धावा फलकावर चढवल्या. त्यानंतर DC डाव थोडासा मंदावला होता, परंतु रिषभ व त्रिस्तान स्तब्स जोडीने २७ चेंडूंत ५५ धावांची फटकेबाजी केली. रिषभ ( २९) बुमराहच्या स्लोव्हर बाऊन्सवर रोहितच्या हाती झेल देऊन माघारी परतला. स्तब्सने २५ चेंडूंत  ६ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा करून संघाला ४ बाद २५७ धावांवर पोहोचवले. दिल्लीच्या या आयपीएलमधील सर्वोच्च धावा ठरल्या. यापूर्वी २०११ मध्ये पंजाबविरुद्ध ४ बाद २३१ धावा केल्या होत्या. 

लिझाड विलियम्सला दिल्लीने पदार्पणाची संधी दिली आणि तो पहिलेच षटक टाकायला आला. पहिला चेंडू टाकण्यापूर्वी क्रिजजवळ तो पाय घसरून पडला. त्याचा पाय मुरगळता मुरगळता वाचला आणि शूज बदलून तो पुन्हा गोलंदाजीला आला. इशान किशनने दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून रोहितला स्ट्राईक दिली. पण, ही धाव पूर्ण करताना रोहितच्या मार्गात रिषभ आडवा आला होता आणि रोहितने त्याला जोरात ढकलले. हे पाहून रिषभ काही काळ संभ्रमात पडला, परंतु हिटमॅन मस्करी करतोय हे समजताच त्याच्या चेहऱ्यावर हसू परतले.  

 

टॅग्स :आयपीएल २०२४रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सरोहित शर्मा