Join us  

९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 

स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स यांनी कंबर कसली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 3:54 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स यांनी कंबर कसली आहे. नऊ सामन्यांत DC च्या खात्यात ८, तर ८ सामन्यांत MI च्या खात्यात ६ गुण आहे आणि प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोघांनाही विजय आवश्यक आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली कॅपिटल्सला हाच निर्णय अपेक्षित होता. DC च्या संघात पृथ्वी शॉ याच्या जागी कुमार कुशाग्र आणि एनरिच नॉर्खियाच्या जागी लिझाड विलियम्स यांची निवड झाली आहे, तर MI च्या प्ले इंलेव्हनमध्ये गेराल्ड कोएत्झीच्या जागी ल्युक वूड खेळणार आहे. 

Milestones Alert:

  • मोहम्मद नबीला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ५ बळींची गरज आहे
  • हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ४० धावांची आवश्यकता आहे
  • रोहित शर्माने ४१ धावा करताच तो ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ११५०० धावा पूर्ण करेल
  • शे होपला ४२ धावा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करून देणाऱ्या ठरतील
  • इशान किशनचा हा १०० वा आयपीएल सामना आहे.

 

२१ वर्षीय जॅक फ्रेझर मॅकगर्कने ल्यूक वूडच्या पहिल्याच षटकात 4,4,6,0,4,1 असे फटके खेचले आणि दुसऱ्या षटकात त्याने जसप्रीत बुमराहचे सिक्सने स्वागत केले. पुढचा चेंडूही त्याने सरळ चौकार खेचून ९ चेंडूंत ३० धावा पूर्ण केल्या. अभिषेक पोरेलसह त्याने २.४ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. बुमराहच्या एका षटकात त्याने १८ धावा चोपल्या आणि यंदाच्या पर्वातील हे बुमराहचे महागडे षटक ठरले. फ्रेझरने १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ९ चौकार व ३ षटकार खेचले. यंदाच्या पर्वात त्याने दुसऱ्यांदा १५ चेंडूंत फिफ्टी झळकावली आहे.

त्याला रोखण्यासाठी हार्दिक पांड्या स्वतः गोलंदाजीला आला आणि त्याचेही स्वागत चौकार-षटकाराने झाले. फ्रेझरने आतापर्यंत २१ चेंडूंत ६४ धावा उभ्या केल्या आहेत आणि दिल्लीच्या ४.४ षटकांत ७९ धावा झाल्या आहेत. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सजसप्रित बुमराह