Recession: मंदीतही या धंद्यांची होते चांदी, भरपूर कमाई करवून देतात हे चार व्यवसाय, पाहा कसे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 04:46 PM2022-11-10T16:46:34+5:302022-11-10T16:48:54+5:30

Recession: गेल्या काही दिवसांमध्ये जगभरात मंदीचे सावट दिसून येत आहे. अमेरिकेपासून भारतापर्यंत त्याची चिन्हे दिसत आहेत. मंदीमध्ये सर्वच उद्योगधंद्यांचे व्यवहार मंदावतात. मात्र काही व्यवसाय असे आहेत ज्यांची मंदीमध्येही चांदी होते. त्या व्यवसायांवर मंदीचा कुठलाही परिणाम होत नाही. हे व्यवसाय पुढीलप्रमाणे.

गेल्या काही दिवसांमध्ये जगभरात मंदीचे सावट दिसून येत आहे. अमेरिकेपासून भारतापर्यंत त्याची चिन्हे दिसत आहेत. मंदीमध्ये सर्वच उद्योगधंद्यांचे व्यवहार मंदावतात. मात्र काही व्यवसाय असे आहेत ज्यांची मंदीमध्येही चांदी होते. त्या व्यवसायांवर मंदीचा कुठलाही परिणाम होत नाही. हे व्यवसाय पुढीलप्रमाणे.

मंदी कितीही मोठी असली तरी आरोग्य सेवांशी संबंधित व्यवसायांवर त्याचा परिणाम होत नाही. हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स, योगा क्लास आणि इतर आरोग्य सेवांवर आर्थिक चणचण असली तरी लोक खर्च करतात. अशा काळात इतर गोष्टींवरील खर्च कमी करतात.

मंदीच्या काळात लोक मोठ्या रेस्टॉरंट्स किंवा हॉटेलमध्ये जाणे कमी करतात. मात्र घरातील किचनवर होणारा खर्च हा सुरूच असतो. कितीही मोठी मंदी असली किंवा कोरोनासारखी महामारी असली तरी किराणा सामानावर लोकांकडून खर्च होतो.

मंदीच्या काळात फायदा करून देणाऱ्या व्यवसायांमध्ये होम मेंटेनन्सशी संबंधित व्यवसायांचाही समावेश आहे. मात्र सर्वसाधारणपणे मंदीच्या काळात लोक खर्च करणे टाळतात. जमीन, फ्लॅटची विक्री कमी होते. मात्र घरांची देखभाल दुरुस्ती आणि होम शिफ्टिंगसारख्या गोष्टींवर खर्च केला जातो.

आर्थिक संकटाच्या काळात लोक आपल्या खर्चामध्ये कपात करतात. नवीव वाहन खरेदी करणेही टाळतात. मात्र स्वत:कडे असलेल्या वाहनांची देखभाल दुरुस्ती करावीच लागते. त्यामुळे मंदीमध्येही दुरुस्तीचा व्यवसाय बऱ्यापैकी चालतो.