T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली

AUS vs SCO T20 World Cup 2024 : इंग्लंडचे भवितव्य आता ऑस्ट्रेलियाच्या हाती. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 07:29 AM2024-06-16T07:29:31+5:302024-06-16T07:34:28+5:30

whatsapp join usJoin us
 AUS vs SCO T20 World Cup Live Match Updates In Marathi Scotland set Australia a target of 181, Brandon McMullen played well  | T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली

T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs SCO T20 World Cup Live Match Updates In Marathi : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या ३५व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड हे संघ भिडले. कांगारूंनी सुपर-८ मध्ये प्रवेश केला असल्याने त्यांच्यासाठी हा सामना म्हणजे केवळ सराव. मात्र, या सामन्यावर स्कॉटलंड आणि इंग्लंडच्या संघाचे भवितव्य अवलंबून आहे. सेंट लुसिया येथील डॅरन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही बहुचर्चित लढत होत आहे. ऑस्ट्रेलियाने आजचा सामना जिंकला तरच इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान कायम राहील. अन्यथा स्कॉटलंडचा विजय इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवेल. ऑस्ट्रेलियाविरूद्ध तगडे लक्ष्य उभारण्यात नवख्या संघाला यश आले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८० धावा केल्या. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आज देखील बाकावर आहे, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ६० धावा केल्या. याशिवाय रिची बेरिंग्टनने ३१ चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर नाथन एलिस, ॲडम झाम्पा आणि एश्टन एगर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड हे संघ ब गटात आहेत. या गटातून सुपर-८ साठी ऑस्ट्रेलियाने जागा मिळवली आहे. त्यामुळे आता स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये चुरस आहे. आजचा सामना स्कॉटलंडने जिंकल्यास त्यांना सुपर-८ चे तिकीट मिळेल. खरे तर स्कॉटलंडचा पराभवच गतविजेत्यांना स्पर्धेत जिवंत ठेवू शकतो. आताच्या घडीला स्कॉटलंड आणि इंग्लंड दोघांचेही प्रत्येकी ५-५ गुण आहेत. सामना रद्द जरी झाला तरी स्कॉटलंडला एक गुण मिळेल आणि ते सुपर-८ मध्ये जातील. त्यामुळे इंग्लिश संघाचे भवितव्य ऑस्ट्रेलियाच्या हाती आहे. लक्षणीय बाब म्हणजे स्कॉटलंडने आजचा सामना गमावल्यास नेट रनरेटच्या आधारे सुपर-८ साठी पात्र ठरणारा संघ ठरवला जाईल आणि यात इंग्लंडचा संघ आघाडीवर आहे. पण, स्कॉटलंडचा विजय इंग्लिश संघाला घरचा रस्ता दाखवेल.

ऑस्ट्रेलियाचा संघ - 
मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, नाथन एलिस, ॲडम झाम्पा, एश्टन एगर. 

स्कॉटलंडचा संघ -
रिची बेरिंगटन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मिचेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, मॅथ्यू क्रॉस,  मिचेल लीस्क, ख्रिस ग्रीव्स, मार्क वाट, क्रिस्टोफर सोल, ब्राड व्हील, साफयान शरीफ. 

Web Title:  AUS vs SCO T20 World Cup Live Match Updates In Marathi Scotland set Australia a target of 181, Brandon McMullen played well 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.