PAN-Aadhaar Link: जाणून घ्या कसं कराल पॅनला आधार कार्ड लिंक; लिंक न केल्यास होणार निष्क्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:08 PM2021-03-26T21:08:44+5:302021-03-26T21:13:43+5:30

Pan Card, Aadhaar Card : पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास उरले अवघे काही दिवस

PAN CARD आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. महिना अखेरपर्यंत आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला १००० हजार रूपयांचा दंड भरावा लागू शकतो.

आयकर कायदा १९६१ मध्ये जोडण्यात आलेलं नवं कलम २३४एच मुळे हे झालं आहे. सरकारनं २३ मार्च रोजी लोकसभेत वित्त विधेयक २०२१ हे पारित केलं होतं.

सरकारनं दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी जर तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला जोडलं नाही तर यासाठी तुम्हाला १ हजार रूपयांचा दंड द्यावा लागेल. जाणून घेऊया तुम्ही आधार आणि पॅन कार्ड कसं लिंक करू शकाल.

जर कोणत्याही व्यक्तीनं अंतिम तारखेपर्यंत आधार कार्डाशी आपलं पॅन कार्ड जोडलं नाही तर ते रद्द करण्यात येणार आहे.

तसंच त्यानंतर आर्थिक देवाणघेवाणीसाठी या पॅन कार्डाचा वापरही करता येणार नाही.

याचा परिणाम बँकिंग, म्युच्युअल फंड, डीमॅट खातं, नवं बँक खातं उडण्यावर होईल. विना पॅन कार्ड तुम्ही कोणतंही काम करू शकणार नाही.

काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार याची अंतिम तारीख वाढण्याची शक्यता फार कमी आहे. कारण अर्थसंकल्पात करण्यात आलेले प्रस्ताव १ एप्रिल २०२१ पासून लागू करण्यात येतील.

अशातच हा कालावधी वाढण्याची शक्यता नाहीमध्ये जमा आहे. जर तुम्ही ३१ मार्च २०२१ पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डाशी जोडलं नाही तर तुम्ही दंडास पात्र ठराल. यासाठी कमाल १ हजार रूपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

जर तुम्ही आपलं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलं असेल तर तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून तुमचं स्टेटस तापसून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जावं लागेल.

त्यानंतर त्या ठिकाणी Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा.

आपलं स्टेटस पाहण्यासाठी हायपर लिंक Click Here वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार आणि पॅन कार्डाची माहिती भरावी लागेल.

जर तुमचं पॅन आणि आधार लिंक असेल तर तुम्हाला your PAN is linked to Aadhaar Number हा मेसेज दिसेल.

जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेली माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाला लिंक होईल.

एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN म्हणजेच तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि १० अंकी पॅनकार्ड क्रमांक टाईप करा आणि हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक जाईल. यानंतर तुम्हाला https://www1.incometaxindiaefiling.gov.in/home या संकेतस्थळावर जाऊन लिंक आधार यावर क्लिक केल्यानंतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक झालं आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल.