'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 07:41 AM2024-05-13T07:41:09+5:302024-05-13T08:04:27+5:30

Sushma Andhare vs Raj Thackeray: सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसा आदींची आठवण करून देत सोमवारी सायंकाळी मी तुम्हाला उत्तर देईन असे म्हटले आहे. सोशल मीडियावरून अंधारे यांनी राज यांच्यावर टीका केली आहे

'Mr Raj!' Sushma Andhare's reply to Raj Thackeray on Lav Re To video; Kini massacre, Kohinoor mill remembered | 'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण

'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओचे शस्त्र बाहेर काढले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ लावला. यामध्ये त्यांनी ८५ वर्षांचे बाळासाहेब यांच्या हातामधील तलवार  लटलटत असल्याची टीका केली होती. यावरून राज यांनी बाळासाहेबांबाबत अशी वक्तव्ये करणाऱ्या बाई शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उद्धव ठाकरे नियुक्त करतात. ज्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते बसतात. वर आपले वडिलांवर प्रेम असल्याचा दावा करतात, हे पटणारे नाही, अशी टीका केली होती. यावर आता सुषमा अंधारे यांचे प्रत्यूत्तर आले आहे. 

सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसा आदींची आठवण करून देत सोमवारी सायंकाळी मी तुम्हाला उत्तर देईन असे म्हटले आहे. सोशल मीडियावरून अंधारे यांनी राज यांच्यावर टीका केली आहे. 

तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आला आहात. शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे, असे सांगताना माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे. बाळासाहेब म्हणतात, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली? असा टोलाही अंधारे यांनी लगावला. 

27 वर्षांपूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असे जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळे दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ? असा सवालही केला आहे. माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा, असेही अंधारे म्हणाल्या. 

Web Title: 'Mr Raj!' Sushma Andhare's reply to Raj Thackeray on Lav Re To video; Kini massacre, Kohinoor mill remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.