Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:08 AM2024-05-13T11:08:14+5:302024-05-13T11:12:54+5:30

Maharashtta Lok Sabha Election 2024 Live : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे.

आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांनाही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

अभिनेता सुबोध भावेने पत्नीसह सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. फोटो शेअर करत म्हणाला की, "लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया,मतदान करूया! आम्ही करून आलो,तुम्हीही करा! जय हिंद!"

अभिनेत्री आर्या आंंबेकर हिनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, सर्वोच्च प्राधान्य. प्रत्येक मत महत्त्वाचे! मतदान करा. तुमचे मत महत्त्वाचे आहे.

अभिनेत्री नेहा महाजन हिने देखील मतदान केले आणि नंतर फोटो शेअर करत चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तिने म्हटले की, कृपया मतदान करा. लोकशाही जिवंत ठेवा.

अभिनेत्री श्रृती मराठे हिनेदेखील आई वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले की, मी केले. तुम्ही मतदान केले का?

जुई गडकरीनेही बजावला मतदानाचा हक्क. फोटो शेअर करत लिहिले की, मतदान केले.

सोनाली कुलकर्णीनेदेखील आई वडिलांसोबत मतदान केले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, चेहरा अभिमानाचा आहे! माझी जबाबदारी पार पाडल्याचा मला अभिमान आहे. तुम्ही मतदान केले का? कर्तव्य आणि अधिकार - नाण्याच्या दोन बाजू. कर्तव्य पार पाडल्या शिवाय अधिकार मिळत नाही. लक्षात असूद्या. मतदान करा.

गायत्री दातारनेही मतदान केले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, मतदान करणे हा आपला हक्कच नाही तर आपल्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य देखील आहे! मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमचे मत द्या आणि आपल्या देशाला उद्याच्या चांगल्या आणि उज्वल दिशेने वाटचाल करण्यास मदत करा!

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनेही मतदान केले आणि म्हणाली की, आपल्या हातात काय आहे?” या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे “मतदान”! सारासार विचार करुन, तटस्थपणे आपण चुकीचे इन्फ्लुयन्स तर होत नाही ना याची खातरजमा करत, निष्कर्षाला पोहोचले आणि माझा अधिकार आणि कर्तव्य पार पाडून आले.

अभिनेता सौरभ गोखलेनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिषेक देशमुखने बजावला मतदानाचा हक्क. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री कृतिका देव, बहीण अमृता देशमुख यांनीही मतदान केले. त्याने तिघांचा फोटो शेअर करत लिहिले की, मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे..!

अभिनेता अक्षय वाघमारेनेदेखील मतदान केले. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, लोकशाहीचा उत्सव

अभिनेता शाल्व किंजवडेकर यानेदेखील मतदान केले. त्याने फोटो शेअर करत विचारले की, कोथरुड वालो वोट किया क्या?