Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 09:39 PM2024-05-12T21:39:43+5:302024-05-12T22:04:28+5:30

Jio Rs. 895 Prepaid Plan Details: जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या...

नवी दिल्ली : रिलायन्स जिओचे सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जास्त युजर्स आहेत. देशभरात जवळपास ४६ कोटी लोक जिओचे सिम कार्ड वापरतात. जिओकडे सर्व प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड युजर्ससाठी अनेक धमाकेदार प्लॅन आहेत.

रिलायन्स जिओकडे दीर्घ वैधतेसह अनेक रिचार्ज प्लॅमन देखील उपलब्ध आहेत. जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या...

रिलायन्स जिओ कंपनी आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी आणि जिओ फोन युजर्ससाठी शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म प्लॅन ऑफर करते. जिओने आपल्या ग्राहकांसाठी असा प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये यूजर्सना 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 11 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते.

रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 895 रुपयांचा प्लॅन अॅड केला आहे. ज्या युजर्सकडे जिओ फोन आहे आणि त्यांना लाँग व्हॅलिडिटी देखील हवी आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वात परवडणारा आहे.

जिओच्या 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 11 महिन्यांची लाँग व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये युजर्स 11 महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंग करू शकतात.

जर या प्लॅनच्या डेटा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना दर 28 दिवसांनी 2GB डेटा मिळेल. यानंतर ही ऑफर आपोआप रिन्यू होईल. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की यूजर्सना दर महिन्याला फक्त 2 GB डेटा मिळतो. त्याचप्रमाणे एसएमएस सुविधाही उपलब्ध आहे.

कंपनी युजर्सना 28 दिवसांसाठी 50 मोफत एसएमएस देते. तसेच, या प्लॅनमध्ये आपल्या ग्राहकांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा सुद्धा अॅक्सेस दिला जातो.