LPG बुकिंगच्या नियमात मोठा बदल; कोणत्याही एजन्सीकडून आता घेता येऊ शकणार सिलिंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 05:32 PM2021-04-26T17:32:26+5:302021-04-26T17:38:34+5:30

LPG booking rules इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्या लवकरच एकत्र एक विशेष व्यासपीठ तयार करण्याचा विचार सरकारच्या वतीने केला जात आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल, असे सांगितले जात आहे. (now lpg gas cylinder can be refilled with any gas agency)

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे नियोजन आणि गणित दोन्ही बिघडल्याचे दिसत आहे. (LPG gas cylinder)

गॅस हा प्रत्येकाची गरज आहे. आतापर्यंत ग्राहक संबंधित गॅस एजन्सीवर LPG सिलिंडर घेण्यास आणि ते पुन्हा भरून देण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे.

मात्र, सरकार आता या नियमात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार आणि तेल कंपन्या एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम करीत आहेत. (lpg booking new rules)

त्यामुळे आता यानंतर येत्या काही दिवसांत कोणत्याही एजन्सीकडून एलपीजी सिलिंडर घेऊ शकणार आहे किंवा त्या एजन्सीकडून ते सिलिंडर पुन्हा भरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकार स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देत असून, यासाठी देशातील १०० टक्के घरात LPG सिलिंडर वितरीत करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. देशातील तीन मोठ्या तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) यांच्याशी चर्चा करीत आहे.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्या लवकरच एकत्र एक विशेष व्यासपीठ तयार करण्याचा विचार सरकारच्या वतीने केला जात आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल, असे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला LPG ग्राहक ज्या कंपनीकडून गॅस एजन्सीने कनेक्शन घेतले आहे, केवळ त्याच कंपनीचे सिलिंडर घेऊ शकतात. परंतु नवीन नियमानुसार, ग्राहक घरी बसलेल्या कोणत्याही कंपनीचे सिलिंडर मिळवू शकतात.

याद्वारे LPG ग्राहक जवळच्या गॅस एजन्सीकडून त्यांचे बुकिंग करून घेऊ शकतात. इतर शहर किंवा परिसरात राहणाऱ्यांना गॅस सिलिंडर मिळण्यास स्थलांतर करणार्‍यांना अडचणी येणार नाहीत, असेही सांगितले जात आहे.

LPG गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरेच कागदपत्र द्यावी लागतात. त्यानंतरच आपल्याला गॅस सिलिंडर देण्यात येतो. आता मात्र LPG गॅस

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली केली आहे. आता केवळ एका कॉलवर ५ किलो LPG सिलिंडर सहज घरी मिळू शकेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. हे विशेष.

आपल्या शहरातील कोणत्याही इंडियन गॅस वितरकाकडून सहजपणे ५ किलो LPG सिलिंडर खरेदी करता येऊ शकतो. गॅस एजन्सीवर जाऊनही ५ किलोचा LPG सिलिंडर लगेचच घेऊन येऊ शकतो.

इंडियन ऑइल कंपनीने 1800-22-4344 हा टोल फ्री क्रमांक ५ किलोचे LPG सिलिंडर ऑर्डर करण्यासाठी जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क करून ५ किलो LPG सिलिंडर मागवता येऊ शकतो.

मात्र, यासाठी नाममात्र वितरण शुल्क २५ रुपये द्यावे लागेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा देणे आवश्यक असेल, असे सांगितले जात आहे.

LPG सिलिंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या २ तासांत घरी येईल. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारचा ऍड्रेस प्रूफ देण्याची आवश्यता लागणार नाही. दिल्लीत या सिलिंडरची किंमत अनुदानाशिवाय ३४० रुपये आहे.