SEBI च्या कारवाईनंतर Jane Street ने भरले ४८४० कोटी रुपये, आता पुढे काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:40 IST2025-07-14T14:20:31+5:302025-07-14T14:40:50+5:30
Jane Street Trading: अमेरिकन ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटवर स्टॉक मॅनिपुलेशनद्वारे हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

Jane Street Trading: गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटचे (Jane Street) नाव चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, या कंपनीने स्टॉक मॅनिपुलेशनद्वारे हजारो कोटी रुपयांची हेराफेरी केली आहे.
ही बाब समोर आल्यानंतर बाजार नियामक सेबीने जेन स्ट्रीटवर कठोर कारवाई करत, भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये बंदी घातली. तसेच, चुकीच्या पद्धतीने कमावलेले हजारो कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश होते दिले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, न्यू यॉर्कमुख्यालय असलेल्या ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटने स्टॉक मॅनिपुलेशन प्रकरणात SEBI च्या आदेशानुसार, एस्क्रो खात्यांमध्ये ५६७ दशलक्ष डॉलर्स (४,८४३.५ कोटी रुपये) जमा केले आहेत.
एस्क्रो खाते म्हणजे असे खाते, जिथे एक तृतीय पक्ष व्यवहारात सहभागी असलेल्या दोन पक्षांसाठी आवश्यक असलेली रक्कम ठेवतो. याला सामान्यतः मॉर्टगेज एस्क्रो खाते असेही म्हणतात. यामध्ये, व्यवहाराशी संबंधित सर्व अटी पूर्ण होईपर्यंत रक्कम ठेवली जाते.
बँक निफ्टी इंडेक्समध्ये फेरफार करुन जेन स्ट्रीटला हे कथित उत्पन्न मिळाले. विशेषतः, साप्ताहिक पर्याय समाप्तीच्या दिवशी घेतलेल्या व्यवहारांवर त्यांनी मोठा नफा कमावला.
या प्रकरणावर, सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी अलीकडेच सांगितले होते की, जेन स्ट्रीटचे प्रकरण बँक निफ्टी इंडेक्सवर केंद्रित होते, जिथे कंपनीने ऑप्शन एक्सपायरी दरम्यान धोरणात्मकपणे ट्रेडिंगची वेळ ठरवून बाजारावर प्रभाव पाडल्याचा आरोप आहे.
जेन स्ट्रीटच्या फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, ३ जुलै २०२५ रोजी सेबीने कंपनीला भारतात व्यवसाय करण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम आदेश जारी केला होता, ज्यामध्ये ती 'इंट्रा-डे इंडेक्स फेरफार'मध्ये सहभागी असल्याचे म्हटले होते.