PPF खातेधारकांसाठी खुशखबर! नव्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री 'ही' घोषणा करू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:50 PM2022-01-06T13:50:03+5:302022-01-06T14:03:49+5:30

PPF : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) देखील आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत आणि पीपीएफची (PPF) कमाल वार्षिक ठेव मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : 2022-23 चा अर्थसंकल्प (Union Budget 2022-23) सादर होण्यास आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि भागधारकांव्यतिरिक्त, राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना सूचनांची यादी दिली आहे.

यातच, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) देखील आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत आणि पीपीएफची (PPF) कमाल वार्षिक ठेव मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे.

दरम्यान, यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दिवशी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अहवालानुसार, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने (ICAI) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मधील गुंतवणुकीची कमाल मर्यादा सध्याच्या 1.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे.

ICAI च्या या शिफारसीमध्ये, PPF ची ठेव मर्यादा वाढवणे आवश्यक आहे, कारण ही एकमेव सुरक्षित आणि कर-प्रभावी बचत योजना आहे. ICAI ने असेही म्हटले आहे की, PPF ठेव मर्यादेत वाढ केल्याने GDP च्या टक्केवारीच्या रूपात घरगुती बचतीला चालना मिळेल आणि त्याचा महागाईविरोधात प्रभाव पडेल.

PPF मध्ये योगदानाची वार्षिक मर्यादा सध्याच्या 1.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये करण्यात यावी. तसेच, कलम CCF अंतर्गत कपातीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये केली जाऊ शकते.

लोकांना मोठ्या प्रमाणात बचतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कलम 80C अंतर्गत कपातीची रक्कम 1.5 लाख रुपयांवरून 2.5 लाख रूपये करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 हा 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा PPF हा भारतातील सर्वात लोकप्रिय, दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. निवृत्तीनंतर दीर्घकाळ बचत करण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी ही बचत योजना आहे.

हल्लीच्या काळात सुरक्षित आणि टॅक्सही वाचेल अशी गुंतवणूक म्हणजे PPF. यात तुम्ही वर्षाला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता.