सोनं-चांदी पुन्हा महागले! सणासुदीच्या काळात खरेदी करण्यापूर्वी नवीन दर तपासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:38 PM2023-11-02T15:38:30+5:302023-11-02T15:44:50+5:30

Gold Silver Latest Rate : गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले.

भारतात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणावर सोनं-चांदी खरेदी करतात. दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे.

यावर्षी धनत्रयोदशीचा सण १० नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा केला जाईल. याआधी आज २ नोव्हेंबर २०२३ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये आज सोन्याचा दर ६०,८९० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर उघडला. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ दिसून आली आहे.

आता कालच्या तुलनेत १२८ रुपये वाढीसह ६०,९१३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. काल सोन्याचा भाव ६०,७८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसत आहे. आज चांदीचा व्हावहार सुरू झाल्यानंतर तो ७१,६९० रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवण्यात आली आहे.

चांदीचे दर कालच्या तुलनेत ५३३ रुपयांनी महाग झाले आणि ७१,८३१ रुपये प्रति किलो या पातळीवर आहे. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव ७१,२९८ रुपये प्रति किलोवर बंद झाला.

नवी दिल्लीत २४ कॅरेट सोने ६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने ६१,६४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो

चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने ६२,१३० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७७,७०० रुपये प्रति किलो, मुंबईत २४ कॅरेट सोने ६१,६४० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,१०० रुपये प्रति किलो.

नोएडामध्ये २४ कॅरेट सोने ६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो तर पाटणामध्ये २४ कॅरेट सोने ६१,६९० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७४,८०० रुपये प्रति किलो एवढे दर आहेत.