इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 08:39 PM2024-06-14T20:39:00+5:302024-06-14T20:41:42+5:30

G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अनेक देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली.

Italian PM Giorgia Meloni welcomes Prime Minister Narendra Modi, watch the video | इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ

इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ

G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्वागत केले. भारत एक 'आउटरीच नेशन' म्हणून G-7 शिखर परिषदेत सहभागी होत आहे. G7 आउटरीच समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी १३ जून उशिरा इटलीतील अपुलिया येथे पोहोचले.

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जागतिक आव्हाने सोडवण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी शुक्रवारी G-7 शिखर परिषदेत जागतिक नेत्यांशी अर्थपूर्ण चर्चा करण्यास ते खूप उत्सुक आहेत. G7 शिखर परिषदेच्या 'आउटरीच सेशन'मध्ये सहभागी होण्यासाठी अपुलियाला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी या नेत्यांची भेट घेतली

G-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. याशिवाय इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरीय क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून आयोजित केलेल्या सत्रात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. या सत्रात पोप फ्रान्सिसही सहभागी होणार आहेत. पोप फ्रान्सिस यांचीही मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "G 7 शिखर परिषदेसाठी त्यांची सलग तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला आल्याने मला आनंद झाला आहे." पंतप्रधानांनी त्यांचा पूर्वीचा इटली दौरा आणि पंतप्रधान मेलोनी यांच्या भारतभेटीचेही स्मरण केले, ज्यांनी द्विपक्षीय संबंध वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीमध्ये पोहोचलो. जागतिक नेत्यांसोबत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी होण्यास उत्सुक. जागतिक आव्हाने एकत्रितपणे सोडवणे आणि उज्ज्वल भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हे आमचे ध्येय आहे. २०२१ मधील G20 शिखर परिषदेसाठी मी इटलीला दिलेली भेट मला मनापासून आठवते. पंतप्रधान मेलोनी यांच्या गेल्या वर्षीच्या दोन भारत भेटी आमच्या द्विपक्षीय कार्यसूचीला गती आणि सखोलता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. भारत-इटली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक आणि भूमध्यसागरीय क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

Web Title: Italian PM Giorgia Meloni welcomes Prime Minister Narendra Modi, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.