फ्लावर नहीं फायर है..! संस्कृती बालगुडेनं केले शॉर्ट हेअर, डॅशिंग अंदाजातील फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:49 PM2024-06-14T12:49:15+5:302024-06-14T12:55:00+5:30

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेने नव्या लूकमध्ये हटके फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

संस्कृती बालगुडे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.

मालिका ते चित्रपट असा प्रवास करणाऱ्या संस्कृती बालगुडेने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

संस्कृती अभिनेत्रीशिवाय उत्तम नृत्यांगणा आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच संस्कृती बालगुडेने शॉर्ट हेअर करत मेकओव्हर केला आहे. यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे.

संस्कृती बालगुडेने नव्या लूकमध्ये हटके फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये तिने हटके पोझ दिल्या दिसून खूपच डॅशिंग अंदाजात दिसते आहे.

तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

संस्कृती शेवटची ८ दोन ७५ आणि आईच्या गावात मराठीत बोल या सिनेमात पाहायला मिळाली.