छोट्या पडद्याने दिली ओळख, हिंदीतही झळकली ही मराठी अभिनेत्री; आता टीव्हीवर करतेय कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 04:19 PM2024-06-14T16:19:02+5:302024-06-14T16:27:05+5:30

कधी 'देवयानी' तर कधी 'विविधा' बनून जिंकलं प्रेक्षकांचं मन, कोण आहे ही अभिनेत्री?

2012 साली छोट्या पडद्यावर 'देवयानी' मालिकेतून या मराठमोळ्या अभिनेत्रीने एन्ट्री केली. तीच अभिनेत्री आता पुन्हा टीव्हीवर कमबॅक करत आहे.

2011 साली 'फुलवा' मालिकेत सहकलाकाराची भूमिका साकारल्यानंतर तिला 'देवयानी' मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. ही मालिका आजही मराठी प्रेक्षकाची आवडती आहे.

'देवयानी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री आहे शिवानी सुर्वे (Shivani Surve). शिवानीने सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच तिच्या नवीन मालिकेचा प्रोमो आला आहे.

शिवानी स्टार प्लस वरील 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहे. सध्या मालिकेचा प्रोमो आणि टायटल साँग खूप गाजतंय.

शिवानी सुर्वेने 'देवयानी' मालिकेनंतर तिने 'तू जीवाला गुंतवावे' ही मालिकाही केली. यात तिच्यासोबत होता अजिंक्य ननावरे. काही महिन्यांपूर्वीच अजिंक्य आणि शिवानी लग्नबंधनात अडकले.

शिवानीने एक हिंदी मालिकाही केली होती. 'जाना ना दिल से दूर' असं मालिकेचं नाव होतं. या मालिकेतही तिला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं.

नंतर शिवानी 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकली. यात तिने टॉप 3 पर्यंत मजल मारली होती.

नंतर शिवानी काही मराठी सिनेमांमध्येही झळकली. 'वाळवी','सातारचा सलमान','ट्रिपल सीट','झिम्मा 2' मध्ये तिने भूमिका साकारली.

सध्या शिवानीचं प्रोफेशनल आयुष्य जोरात सुरु आहे. तर वैयक्तिक आयुष्यातही ती नवरा अजिंक्य ननावरेसोबत कपल्स गोल्स देत असते.