शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 2:23 PM

1 / 10
अदानी समुहाच्या (Adani Group) काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये अद्यापही घसरण होतानाच दिसत आहे. सोमवारपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
2 / 10
यामुळे अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. Bloomberg Billionaires Index नुसार गेल्या चार दिवसांमध्ये त्यांच्या नेटवर्थमध्ये १३.२ अब्ज डॉलर्सची म्हणजेच ९७,८५२ कोटी रूपयांची घसरण झाली आहे.
3 / 10
गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये जितक्या तेजीनं वाढ झाली होती, तितक्याच तेजीनं ती आता कमी होताना दिसत आहे. या आठवड्यात अन्य अब्जाधिशांच्या तुलनेत अदानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घसरण झाली आहे.
4 / 10
काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा एकच पायरी दूर होते. तसंच त्यावेळी ते लवकरच अंबानी यांना मागे सारतील असं चित्र निर्माण झालं होतं.
5 / 10
एनएसडीएलनं तीन परदेशी फंड्सची खाती सील केल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.
6 / 10
तसंच त्यांच्याकडे अदानी समुहाच्या ४३,५०० कोटी रूपयांचे शेअर्स असल्याचंही म्हटलं होतं परंतु अदानी समुहाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं होतं.
7 / 10
या खुलास्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. शुक्रवारी अदानी समुहाच्या सहा कंपन्यांपैकी तीन कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शेअर्समध्ये लोअर सर्किट (Lower Circuit) लावण्यात आलं होतं.
8 / 10
अदानी समुहाची महत्त्वाची मानली जाणारी कंपनी अदानी ग्रीन एनर्जीच्या (Adani Green Energy) शेअर्समध्ये या आठवड्यात १२.४ टक्क्यांची घसरण दिसू आली होती.
9 / 10
याच प्रकारे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनमिक झोन (Adani Ports & Special Economic Zone), अदानी पॉवर (Adani Power), अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) च्या शेअर्समध्येही कमीतकमी २२ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.
10 / 10
याशिवाय अदानी समुहाची आणखी एक महत्त्वाची कंपनी अदानी एन्टरप्राईजेसच्या (Adani Enterprises) शेअर्समध्ये १३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.
टॅग्स :Adaniअदानीshare marketशेअर बाजारMONEYपैसाIndiaभारतRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानी